Join us

'कोल्डप्ले'च्या Live कॉन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराहने लावली हजेरी; बँडने त्याच्यासाठी गायलं खास गाणं

Jasprit Bumrah Coldplay Concert Chris Martin : कोल्डप्लेचा लीड सिंगर ख्रिस मार्टिनने बुमराहसाठी खास गाणं लिहिलं अन् सादर केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:21 IST

Open in App

Jasprit Bumrah Coldplay Concert Chris Martin : भारतात सध्या दोन गोष्टींची तुफान चर्चा आहे. त्यापैकी एक म्हणजे स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह. प्रत्येक भारतीयाच्या बोलण्यात त्याचा कधी ना कधी उल्लेख येतोच. त्यासोबत सध्या भारतात दुसरी सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे प्रसिद्ध ब्रिटीश म्युझिक बँड कोल्डप्ले. हा बँड सध्या भारतात आहे आणि खूप धमाल करत आहे. गेल्या वर्षी या बँडच्या 'इंडिया टूर'ची घोषणा झाल्यापासूनच भारतात तिकिटांसाठी गर्दी झाली होती. २६ जानेवारीला अहमदाबादमध्येही हा जल्लोष पाहायला मिळाला. या कार्यक्रमासाठी अहमदाबादमध्ये जसप्रीत बुमराहने हजेरी लावली आणि कोल्डप्ले बँडने त्याच्यासाठी एक छोटंसं गाणंही गायलं.

कोल्डप्ले म्युझिक बँडची कॉन्सर्ट शनिवार, रविवारी गुजरातमधील अहमदाबाद होती. तिथे लाखो चाहते सलग दोन दिवस जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सुपरहिट बँड ऐकण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी आले होते. रविवारी प्रजासत्ताक दिनी चाहत्यांची प्रचंड गर्दी केलेली असताना जसप्रीत बुमराहनेही कोल्डप्ले साठी हजेरी लावली. 

जसप्रीत बुमराह कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये...

मुंबईत झालेल्या कॉन्सर्टमध्ये कोल्डप्ले बँडने बुमराहची खास आठवण काढली होती. पण अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये जेव्हा टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा चेहरा स्टेडियममध्ये मोठ्या स्क्रीनवर दिसू लागला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बुमराहसोबत त्याची आई आणि मोठी बहीणही उपस्थित होत्या. चाहत्यांनी बुमराहला पाहताच स्टेडियममधील जल्लोष केला. यावेळी कोल्डप्ले बँडला लीड सिंगर ख्रिस मार्टिन याने बुमराहसाठी एक खास गाणं म्हटलं. पाहा व्हिडीओ-

कोल्डप्लेने बुमराहची स्तुती तर केलीच. पण त्याचसोबत तो इंग्लंडच्या संघाविरोधात एका पाठोपाठ विकेट्स घेतो, ती गोष्ट आवडत नसल्याची प्रामाणिक तक्रारही केली. बुमराहच्या चेहऱ्यावरही त्यानंतर हास्य दिसून आले. 

टॅग्स :जसप्रित बुमराहअहमदाबादनरेंद्र मोदी स्टेडियमसंगीत