जसप्रीत बुमराहनं पहिल्यांदा जिंकला हा पुरस्कार! जो रुटसह हॅरी ब्रूक अन् मेंडिसला 'धोबीपछाड'

हा पुरस्कार जिंकणारा तो भारताचा सहावा क्रिकेटर, बुमराहची या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:34 IST2025-01-27T16:29:28+5:302025-01-27T16:34:40+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah becomes 6th Indian to win ICC Test Cricketer of the Year Award | जसप्रीत बुमराहनं पहिल्यांदा जिंकला हा पुरस्कार! जो रुटसह हॅरी ब्रूक अन् मेंडिसला 'धोबीपछाड'

जसप्रीत बुमराहनं पहिल्यांदा जिंकला हा पुरस्कार! जो रुटसह हॅरी ब्रूक अन् मेंडिसला 'धोबीपछाड'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jasprit Bumrah 6th Indian to Win ICC Test Cricketer of the Year Award : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह २०२४ या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू ठरला आहे. इंग्लंडचा जो रुट, हॅरी ब्रूक आणि श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिस या तगड्या फलंदाजांना  'धोबीपछाड' देत बुमराहनं पहिल्यांदा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार पटकवला. आहे. हा पुरस्कार जिंकणारा तो भारताचा सहावा क्रिकेटर ठरलाय. याआधी राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, आर. अश्विन आणि विराट कोहली यांनी हा पुरस्कार पटकवला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जसप्रीत बुमराहसाठी २०२४ वर्ष ठरलं एकदम भारी

भारताच्या जलदगती गोलंदाजानं मागील वर्षात जबरदस्त कामगिरी करत अनेक विक्रम मोडित काढून नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराहनं १३ कसोटी सामन्यात १४.९२ च्या सरासरीसह ३०.१६ च्या स्ट्राइक रेटनं ७१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम करून तो वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटूसाठीच्या शर्यतीत सामील झाला होता. अखेर त्यानेच बाजी मारलीये. 

जसप्रीत बुमराहसाठी २०२४ वर्ष ठरलं एकदम भारी

भारताच्या जलदगती गोलंदाजानं मागील वर्षात जबरदस्त कामगिरी करत अनेक विक्रम मोडित काढून नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराहनं १३ कसोटी सामन्यात १४.९२ च्या सरासरीसह ३०.१६ च्या स्ट्राइक रेटनं ७१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम करून तो वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटूंच्या यादीत नामांकित झाला होता. 

जो रुटशी होती तगडी टक्कर

बुमराहला या पुरस्काराच्या शर्यतीत तगडी टक्कर होती ती इंग्लंडच्या जो रुटची. त्याने १७ कसोटी सामन्यात ५५.५७ च्या सरासरीनं १५५६ धावा केल्या होत्या. यात ६ शतकांसह ५ अर्धशतकांचा समावेस होता. कसोटी कारकिर्दीत पाचव्यांदा जो रुटनं एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम करून दाखवला. पण बुमराहसमोह तो फिकाच ठरला. 

या बॅटरचाही लागला नाही निभाव

याशिवाय हॅरी ब्रूक हा देखील सर्वोत्कृष्ट कसोटीपटूच्या शर्यतीत होता. त्याने १२ कसोटी सामन्यात ५५.०० च्या सरासरीनं ११०० धावा केल्या होत्या. ज्यात ४ शतकांसह ३ अर्धशतकांचा समावेश होता. श्रीलंकेच्या मेंडिसनं ९ कसोटीत ७४.९२ च्या सरासरीसह ५ शतकासह ३ अर्धशतकाच्या मदतीने १०४९ धावा करत या शर्यतीत एन्ट्री मारली होती. बुमराहसमोर हे दोन बॅटरही आउट झाले.

 

Web Title: Jasprit Bumrah becomes 6th Indian to win ICC Test Cricketer of the Year Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.