जस्सी जैसा कोई नही! जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी; इंग्लंडची जिरवून मोठी भरारी

भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) याने आज इतिहास घडवला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:56 PM2024-02-07T13:56:26+5:302024-02-07T13:56:45+5:30

whatsapp join usJoin us
JASPRIT BUMRAH BECOMES THE FIRST BOWLER IN HISTORY TO BE NO.1 RANKED IN ALL THE 3 FORMATS | जस्सी जैसा कोई नही! जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी; इंग्लंडची जिरवून मोठी भरारी

जस्सी जैसा कोई नही! जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी; इंग्लंडची जिरवून मोठी भरारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. ICC च्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १ स्थान पटकावणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिला आशियाई जलदगती गोलंदाज ठरला आहेय इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जसप्रीतने ९ विकेट्स घेऊन सामना गाजवला आणि त्यामुळेच त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने १०६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात जसप्रीतने दोन्ही डावांत मिळून ९१ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर वन गोलंदाज झाला आणि कसोटीत अव्वल स्थानावर विराजमान होणारा तो भारताचा पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे. 


 ९ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीतला दुसऱ्या कसोटीत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला होता आणि त्याने आयसीसी क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान पटकावले. आर अश्विनची दोन स्थानांनी घसरण झाली आणि तो पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून अश्विन अव्वल स्थानावर होता, परंतु इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला तीन विकेट घेता आल्या होत्या. त्यामुळे त्याची घसरण झाली, दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर कायम आहे.  यापूर्वी जसप्रीत कसोटी क्रमवारीत ३ स्थानांच्या वर कधीच सरकला नव्हता. 
 


यापूर्वी आर अश्विन, रवींद्र जडेजा व बिशन सिंग बेदी यांनी आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. पण, जसप्रीत हा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज आहे. भारताचा फलंदाज यशस्वी जैस्वाल यानेही फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत त्याने २०९ धावांची खेळी केली होती. तो ३७ स्थानांच्या सुधारणेसह २९व्या क्रमांकावर पोहोचला आहे. 
 

Web Title: JASPRIT BUMRAH BECOMES THE FIRST BOWLER IN HISTORY TO BE NO.1 RANKED IN ALL THE 3 FORMATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.