Jasprit Bumrah, ICC Ranking : जसप्रीत बुमराह जगात 'एक नंबर' ठरला, शतकवीर सूर्यकुमार यादव भारतीयांमध्ये टॉपर!

ICC Ranking : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) काल पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. १९ धावा देताना ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 03:21 PM2022-07-13T15:21:21+5:302022-07-13T15:22:16+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah becomes the number 1 ranked ODI bowler in ICC ranking, Suryakumar Yadav climbs 44 position to become India's highest Ranked T20i batsman at No.5 position. | Jasprit Bumrah, ICC Ranking : जसप्रीत बुमराह जगात 'एक नंबर' ठरला, शतकवीर सूर्यकुमार यादव भारतीयांमध्ये टॉपर!

Jasprit Bumrah, ICC Ranking : जसप्रीत बुमराह जगात 'एक नंबर' ठरला, शतकवीर सूर्यकुमार यादव भारतीयांमध्ये टॉपर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Ranking : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) काल पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. १९ धावा देताना ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या या कामगिरीचा फायदा त्याला जागतिक वन डे क्रमवारीतही झाला. भारताचा हा प्रमुख गोलंदाज आता जगात अव्वल ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकले आहे. ICC ने वन डे क्रमवारी जाहीर केली. त्यात बुमराहने पाच स्थानांच्या सुधारणेसह थेट अव्वल क्रमांक पटकावला.
 


कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये टॉप टेन गोलंदाजांमध्ये समावेश असलेल्या तीन खेळाडूंमध्ये जसप्रीतचा समावेश आहे. कसोटीत जसप्रीत तिसऱ्या स्थानावर आहे. वन डे क्रिकेटमध्ये त्याने ७१८ गुणांसह अव्वल स्थान पटकावताना बोल्ट ( ७१२) व पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ( ६८१) यांना मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड चौथ्या आणि अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान पाचव्या क्रमांकावर आहे. भारताच्या मोहम्मद शमीनेही क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा करताना २३ वा क्रमांक पटकावला आहे. 
वन डे फलदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा चौथ्या व विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. या दोघांमधील केवळ एक गुणाचे अंतर आहे. शिखर धवनने एक स्थान वर सरकताना १२वा क्रमांका पटकावला आहे.  

ट्वेंटी-२० क्रमवारीत सूर्यकुमार यादव हिट!
 

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) ४४ स्थानांची गरुड भरारी घेत थेट पाचवे स्थान पटकावले आहे. ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये सूर्यकुमार हा एकमेव भारतीय आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारने ७ स्थान वर सरकताना ७ वा क्रमांक पटकावला आहे. तोही एकमेव भारतीय टॉप टेनमध्ये आहे. 

Web Title: Jasprit Bumrah becomes the number 1 ranked ODI bowler in ICC ranking, Suryakumar Yadav climbs 44 position to become India's highest Ranked T20i batsman at No.5 position.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.