ICC Ranking : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) काल पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. १९ धावा देताना ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या या कामगिरीचा फायदा त्याला जागतिक वन डे क्रमवारीतही झाला. भारताचा हा प्रमुख गोलंदाज आता जगात अव्वल ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकले आहे. ICC ने वन डे क्रमवारी जाहीर केली. त्यात बुमराहने पाच स्थानांच्या सुधारणेसह थेट अव्वल क्रमांक पटकावला.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) ४४ स्थानांची गरुड भरारी घेत थेट पाचवे स्थान पटकावले आहे. ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये सूर्यकुमार हा एकमेव भारतीय आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारने ७ स्थान वर सरकताना ७ वा क्रमांक पटकावला आहे. तोही एकमेव भारतीय टॉप टेनमध्ये आहे.