Jasprit Bumrah Back Spasm Injury : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या सिडनी कसोटी सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. फलंदाजांनी निराश केल्यावर एकट्याच्या जोरावर जसप्रीत बुमराहनं संघाला सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यासाठी त्याच्यावर पडलेला भार टीम इंडियावर सिडनी कसोटीत भारी पडला. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह बॅटिंगसाठी मैदानात उतरला. पण गोलंदाजीसाठी तो फिट नाही, हे भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरल्यावर लक्षात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघाकडून सर्वाधिक ओव्हर
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त होण्यामागे वर्कलोड मॅनेज करण्यातील उणीव ही कारणीभूत ठरलीये, असे म्हटल्यास ते चुकीच ठरणार नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दौऱ्यात बुमराहाच्या खांद्यावर ओझे असणार हे स्पष्ट होते. पण दुसऱ्या बाजूनं त्याला साथ मिळायला हवी तशी मिळाली नाही. परिणामी ५ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेताना जसप्रीत बुमराहनं ९ डावात भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने संघाकडून सर्वाधिक १५१.२ षटके गोलंदाजी केली.
बॅटिंग मजबूत करण्याच्या नादात टीम मॅनेजमेंटनं बुमराहावरील ताण वाढवला?
पाठीच्या दुखापतीमुळे वर्षभर संघाबाहेर राहिल्यावर जसप्रीत बुमराहनं २०२३ मध्ये जबरदस्त कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक मालिकेत तो संघासाठी दमदार गोलंदाजी करताना दिसला. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फलंदाजी मजबूत करण्यासाठी टीम इंडियाने जी प्लेइंग इलेव्हन निवडली ती स्टार गोलंदाजासाठी भार वाढवणारी ठरली. वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी यासारख्या ऑल राउंडलरा संघात खेळवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला. पण या मंडळींकडून अधिक गोलंदाजी झाली. नाही. परिणामी जसप्रीत बुमराहला छोट्या छोट्या स्पेलमध्ये अधिक गोलंदाजी करावी लागली. याचा फटका शेवटच्या कसोटी सामन्यात बसला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बुमराहची कामगिरी
पर्थ कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या डावात १८ षटकात बुमराहनं ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात १२ षटका टाकत त्याने ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. अॅडिलेड कसोटीत २५ षटकात त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत. ब्रिस्बेन कसोटी सान्यातील पहिल्या डावात २८ षटकात ६ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ६ षटकात बुमराहनं ३ विकेट्स घेतल्या. मेलबर्नच्या मैदानात बुमराहनं पहिल्या डावात २८.४ आणि २४.४ षटकांची गोलंदाजी करताना अनुक्रमे ६ आणि ५ विकेट्स घेतल्या. सिडनी कसोटी सामन्यात जस्सीनं १० षटकात २ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: Jasprit Bumrah Face Back Spasm Injury Due To Most Overs Bowled BGT Ind vs AUS Series Sydney Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.