आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहची मोठी झेप; कोहली-स्मिथ यांच्यात चुरस

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 02:19 PM2019-08-27T14:19:24+5:302019-08-27T14:20:05+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah has stormed into the top 10 of the ICC Test bowling rankings | आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहची मोठी झेप; कोहली-स्मिथ यांच्यात चुरस

आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहची मोठी झेप; कोहली-स्मिथ यांच्यात चुरस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतीने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या 418 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 100 धावांत तंबूत परतला. या विजयात बुमराहचे मोठे योगदान ठरले. त्यानं या कसोटीत 6 विकेट्स घेतल्या. याच कामगिरीच्या जोरावर बुमराहने आयसीसी क्रमवारीत 9 स्थानांची मोठी झेप घेतली.

बुमराहने दुसऱ्या डावात 7 धावांत 5 विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कमी धावा देऊन पाच विकेट घेणारा बुमराह हा यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम वेंकटेश राजू ( 6 /12 वि. श्रीलंका, 1990) याच्या नावावर होता. पण, याहीपेक्षा या पाच विकेट बुमराहसाठी विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या ठरल्या. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज अशा चारही देशांत एकाच कसोटीत पाच विकेट घेण्याचा पराक्रम करणारा बुमराह हा पहिला भारतीय आणि आशियाई गोलंदाज ठरला. वकार युनिस, वसीम अक्रम, कपील देव, मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आदी दिग्गजांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही. 
या कामगिरीच्या जोरावर बुमराहनं क्रमवारीत 9 स्थानांची सुधारणा केली. त्यानं 7 व्या क्रमांकावर झेप घेतली. त्याचवेळी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टनं दोन स्थानांच्या सुधारणेसह अव्वल पाचात स्थान पटकावलं. 


विराट कोहली-स्टीव्ह स्मिथ कडवी टक्कर
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. कोहली ( 910) आणि स्मिथ ( 904) यांच्यातील गुणफरक हा केवळ 6 असा राहिला आहे. त्यामुळे अॅशेस कसोटी मालिका संपेपर्यंत स्मिथ अव्वल स्थानी विराजमान होऊ शकतो.

बेन स्टोक्सची विक्रमी कामगिरी
इंग्लंडला अशक्यप्राय विजय मिळवून देणाऱ्या बेन स्टोक्सने अष्टपैलू खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली. अॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्टोक्सने नाबाद 135 धावांची खेळी करत इंग्लंडला थरारक विजय मिळवून दिला. 

Web Title: Jasprit Bumrah has stormed into the top 10 of the ICC Test bowling rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.