Jasprit Bumrah IPL Debut: ४ एप्रिल २०१३.. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यातील सामना.. सामन्यात नाणेफेकीच्या वेळी संघातील बदलाबाबत बोलताना जसप्रीत बुमराहचं नाव घेण्यात आलं. या सामन्यात बुमराहने IPLमध्ये पदार्पण केले आणि संपूर्ण हंगामात तो त्याच्या एक्शनमुळे व वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेचा विषय ठरला. पहिल्या सामन्यापासून आजपर्यंत त्याने त्याची एक्शन आणि वेग कायम ठेवला. IPLमध्ये सर्वप्रथम बुमराहने विराट कोहलीची विकेट घेतली होती. आज बुमराहला IPL मध्ये ९ वर्षे पूर्ण करून १०व्या वर्षात पदार्पण केलं.
२०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध पदार्पण करणाऱ्या जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच षटकांत विराट कोहलीची विकेट घेत सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. त्यानंतर त्याने त्याच्या पुढच्या षटकात मयंक अग्रवाल आणि डावाच्या १३व्या षटकात करुण नायरलाही बाद केलं होतं. आपल्या पहिल्या सामन्यात त्याने ४ षटकांत ३२ धावा देत ३ बळी घेतले.
जसप्रीत बुमराहला IPL मध्ये खेळून 9 वर्षे झाली. २०२२ चा सीझन हा त्याचा १०वा IPL हंगाम आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे जसप्रीत बुमराह IPL तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान गोलंदाजांपैकी एक आहे. वेगळ्या अॅक्शनसह गोलंदाजी करणारा आणि अचूक यॉर्कर्सचा मारा करणारा असा नावलौकिक बुमराहने गेल्या ९ वर्षांत मिळवला आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत १०८ सामन्यात १३३ बळी घेतले आहेत. यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०३ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने २९ कसोटीत १२३, ७० एकदिवसीय सामन्यात ११३ तर ५७ टी२० सामन्यांमध्ये ६७ बळी घेतले आहेत.
Web Title: Jasprit Bumrah IPL debut on this day 9 years ago taken Virat Kohli wicket in his first over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.