Join us

Champions Trophy :"टिक टिक वाजते डोक्यात; धड धड वाढते ठोक्यात!" बुमराह फिट की, अनफिट?

या दुखापतीतून सावरून तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उतरणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:27 IST

Open in App

Jasprit Bumrah Latest Fitness Update From NCA Scans And Assessment Done : भारतीय संघातील हुकमी एक्का जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी फिट आहे की, नाही? या चर्चित प्रश्नाचं उत्तर पुढच्या २४ तासांत मिळणार आहे. पाठीच्या दुखापतीनं त्रस्त असल्यामुळे जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात मैदान सोडावे लागले होते. या सामन्यातील दुसऱ्या डावात तो गोलंदाजीही करू शकला नव्हता. या दुखापतीतून सावरून तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उतरणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बुमराह फिट की, अनफिट? पुढच्या २४ तासांत समोर येईल माहिती 

भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात जसप्रीत बुमराहची वर्णी लागली आहे. पण अंतिम यादीत तो दिसणार का? हे त्याच्या फिटनेस रिपोर्ट्सवर अवलंबून आहे. दुखापतीनंतर टीम इंडियाकडून खेळण्यासाठी खेळाडूला फिटनेस सिद्ध करावा लागतो. यासाठी  जसप्रीत बुमराह बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) पोहचल्याचेही पाहायला मिळाले. इथं फिटनेस चाचणीसंदर्भातील प्रक्रिया पार पडली असून त्याचे स्कॅनिंगही झाले आहे. पुढच्या २४ तासांत त्याचे रिपोर्ट्स काय आहेत ते समोर येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

स्कॅननंतर बुमराहला NCA त थांबण्याची शक्यता, कारण..

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) जसप्रीत बुमराहचे स्कॅनची प्रक्रिया पार पडली आहे. रिपोर्ट्स मिळेपर्यंत त्याला तिथंच थांबावे लागू शकते. बीसीसीआयच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली बुमराहच्या सर्व आवश्यक स्कॅनिंग चाचण्या घेण्यात आल्याचे समजेत. या रिपोर्ट्नंतरच तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय ताफ्यासोबत जाणार की, नाही ते स्पष्ट होईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी संघ बंदल होणार की बुमराह संघात कामय राहणार?

जानेवारीमध्ये बुमराहचे स्कॅन करण्यात आले होते. यावेळी न्यूझीलंडच्या प्रसिद्ध डॉक्टरचा सल्ला घेण्यात आला होता. यावेळीचे रिपोर्ट्सही आल्यावर त्याच डॉक्टरांसोबत चर्चा केली जाऊ शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १२ फेब्रुवारीपर्यंत सहभागी संघांना आयसीसीच्या परवानगीशिवाय संघात बदल करता येणार आहे. जसप्रीत बुमराह पूर्णत: फिट असेल तरच तो संघात कायम राहिल अन्यथा त्याच्या जागी अन्य खेळाडूचा संघात समावेश केला जाऊ शकतो. 

टॅग्स :जसप्रित बुमराहचॅम्पियन्स ट्रॉफीभारतीय क्रिकेट संघ