टीम इंडियाच्या आगामी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी बीसीसीआयनं सोमवारी संघ जाहीर केला. या मालिकांमधून प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होणार आहे. दुखापतीमुळे बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात त्यानं टीम इंडियासोबत नेट्समध्ये सराव केला. त्यानंतर आगामी मालिकांसाठी त्याची संघात निवड करण्यात आली. असे असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याआधी त्याला तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे.
त्यासाठी बुमराह रणजी करंडक स्पर्धेत खेळणार आहे. गुजरात विरुद्ध केरळ यांच्यातला सामना बुधवारपासून सुरू होत आहे आणि बुमराह गुजरातचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा सामना पाहण्यासाठी टीम इंडियाचे निवड समिती प्रमुखे एमएसके प्रसाद हजर राहणार आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध तो अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात त्यानं हॅटट्रिक घेतली होती. फिरकीपटू हरभजन सिंग आणि मध्यमगती गोलंदाज इरफान पठाण यांच्यानंतर कसोटीत हॅटट्रिक घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला एक आठवडा शिल्लक असताना बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्ये गेला होता, पण त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचा दिलासा चाहत्यांना मिळाला होता. त्यानंतर मायदेशात परतलेला बुमराह तंदुरुस्तीसाठी कसून सराव केला. बुमराहनं 12 कसोटीत 62 विकेसट्स घेतल्या होत्या. वन डे आणि ट्वेंटी-20त त्याच्या नावावर अनुक्रमे 103 व 51 विकेट्स आहेत.
जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 अन् वन डे संघात पुनरागमनभारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वन डे सामन्यांसाठी बीसीसीआयनं सोमवारी संघ जाहीर केला. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवनची ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत वापसी झाली आहे. रोहित व शमी ट्वेंटी-20 मालिकेत खेळणार नाही.श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया कधी व कुठे भिडणार?
2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येईल.
श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडियाविराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेचे वेळापत्रक 14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाविराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह