Jasprit Bumrah Mumbai Indians Old Video Viral: जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. टी२०, वनडे किंवा कसोटी, फॉरमॅट कोणताही असो, प्रत्येक फलंदाज बुमराहच्या वेगवान गोलंदाजीला घाबरतो. २०२४च्या टी२० विश्वचषकात बुमराहने ४.१७च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आणि मोक्याच्या वेळी विकेट्स मिळवून दाखवल्या. इतर बड्या गोलंदाजांची वनडेची इकॉनॉमीदेखील यापेक्षा खूप वाईट असते. बुमराह विरुद्ध फलंदाज धावा करण्यापेक्षाही विकेट वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. बुमराहच्या वेगाला भलेभले फलंदाज घाबरतात. पण बुमराहचा एक जुना व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
जसप्रीत बुमराहने २०१३ मध्ये IPL मध्ये पदार्पण केले. त्यावेळी तो अवघ्या १९ वर्षांचा होता. मुंबईच्या स्काऊट टीमने त्याचा शोध लावला होता. त्याच्या अनोख्या अँक्शनमुळे कृतीमुळे बुमराह सुरुवातीलाच प्रसिद्धीच्या झोतात आला. मुंबई इंडियन्सने बुमराहचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बुमराहच्या नावासमोर Right Arm Medium - म्हणजेच 'उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज' असे लिहिले होते. यावर तो खूश दिसला नव्हता. व्हिडिओमध्ये बुमराह म्हणताना दिसला- "...पर ये गलत लिखा है... राईट आर्म मिडियम नहीं, राईट आर्म फास्ट..." (पण हे चुकीचे लिहिले आहे, उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज नाही, वेगवान गोलंदाज असं हवं)
बुमराहची पहिली विकेट - विराट कोहली
जसप्रीत बुमराहने IPL 2013मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पदार्पण केले होते. त्याच्यासमोर जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केलेला विराट कोहली होता. विराटने बुमराहला पहिल्या चार चेंडूत तीन चौकार ठोकले. बुमराहला रनअपमध्ये थोडासा त्रास होत होता. त्यानंतर रनअपच्या जवळ वाळू ओतली गेली आणि पुढच्याच चेंडूवर बुमराहने विराट कोहलीला LBW करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.