Bad News : जसप्रीत बुमराह आता 2019मध्ये मायदेशात एकही कसोटी मालिका खेळणार नाही

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला सुरू होण्यासाठी एक आठवडा शिल्लक असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 04:00 PM2019-09-26T16:00:15+5:302019-09-26T16:00:52+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah ruled out of home Tests in 2019, likely to return for T20Is against West Indies | Bad News : जसप्रीत बुमराह आता 2019मध्ये मायदेशात एकही कसोटी मालिका खेळणार नाही

Bad News : जसप्रीत बुमराह आता 2019मध्ये मायदेशात एकही कसोटी मालिका खेळणार नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला सुरू होण्यासाठी एक आठवडा शिल्लक असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली आहे. त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. पण, आता आफ्रिकेपाठोपाठ आणखी एका कसोटी मालिकेत बुमराह खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. 

IANSला संघ व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले की,'' बांगलादेशविरुद्धची मालिका ही कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे लक्ष्य नाही. त्यामुळे बुमराहने पूर्णपणे तंदुरूस्त व्हावे अशी दोघांची इच्छा आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळणार नाही. 2020चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप हे टीम इंडियाचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी बुमराहला तंदुरुस्त ठेवणे, महत्त्वाचे आहे.''
''वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून तो कमबॅक करू शकतो. बुमराहच्या बाबतीत संघ व्यवस्थापनाला कोणताही शॉर्टकट घ्यायचा नाही. पुर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचे पुनरागमन होईल. त्यामुळे बांगलादेश मालिकेपर्यंत तो बरा होण्याची शक्यता कमी आहे,'' असे सूत्रांनी सांगितले.


याचा अर्थ बुमराह 2019मध्ये आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेंतर्गत येणाऱ्या एकाही मालिकेत खेळणार नाही. आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांबरोबरच त्याला बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून तो संघात कमबॅक करेल.

वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकेचे वेळापत्रक
पहिला ट्वेंटी-20 सामना - 6 डिसेंबर 2019 , मुंबई
दुसरा ट्वेंटी-20 सामना - 8 डिसेंबर, तिरुअनंतपुरम
तिसरा ट्वेंटी-20 सामना - 11 डिसेंबर, हैदराबाद
पहिला वन डे सामना - 15 डिसेंबर, चेन्नई
दुसरा वन डे सामना - 18 डिसेंबर, विशाखापट्टणम
तिसरा वन डे सामना - 22 डिसेंबर, कटक

जसप्रीत बुमराहची चाहत्यांना भावनिक साद
बुमराहनं ट्विट केलं की,''दुखापत हा खेळाचा भागच आहे. लवकरात लवकर बरा होण्यासाठी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचे आभार. माझा निर्धार आणखी दृढ झाला आहे आणि आता आहे त्यापेक्षा अधिक दमदार कामगिरीनं कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करेल.''

Web Title: Jasprit Bumrah ruled out of home Tests in 2019, likely to return for T20Is against West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.