Jasprit Bumrah Sanjana Ganesan blessed with baby boy: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाबा झाला. रविवारी बुमराह आशिया कप 2023 मधून ब्रेक घेऊन मुंबईत आला होता. त्यानंतर तो बाबा होणार असल्याचे सांगितले होते. तशातच आता त्यानेच चाहत्यांना खुशखबर दिली. आज सकाळी बुमराहची मुलगी पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने गोंडस मुलाला जन्म दिला. बुमराहने मुलाच्या हाताचा फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.
बुमराहने काय लिहिले?
जसप्रीत बुमराहने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे- आमचे छोटे कुटुंब मोठे झाले आहे आणि आम्हाला कल्पनेपेक्षा जास्त आनंद होत आहे. आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या जीवनातील या नवीन अध्यायाची सुरूवात करत आहोत.
कोण आहे बुमराहची पत्नी संजना गणेसन?
जसप्रीतच्या मुंबईत परतण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. त्याच्या घरी गोड बातमी येणार असल्याने तो मुंबईत परतला. जसप्रीत १५ मार्च २०२१ ला स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेसन हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला. संजना गणेसन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरिंग केले आहे. संजनाने २०१९च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. सिम्बॉससिस इंस्टीट्यूटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं. त्यात तिने गोल्ड मेडल पटकावलं. त्यानंतर २०१३-१४मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केलं.
स्पोर्ट्स प्रेझेंटर बनण्यापूर्वी संजनाने २०१२मध्ये 'Femina Style Diva’ फॅशन शो आणि २०१३मध्ये 'Femina Miss India Pune’ यात सहभाग घेतला होता. त्याच वर्षी तिनं Femina Officially Gorgeous Competition' मध्ये सहभाग घेतला. २०१४ मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत संजनाने प्रवेश केला होता. संजना MTV Splitsvilla7 मधून टेलेव्हिजनवर पदार्पण केलं होतं, परंतु तिला दुखापतीमुळे ही मालिका सोडावी लागली. त्यानंतर तिनं आयपीएलमध्ये अँकर म्हणून काम सुरू केलं आणि तेथेच जसप्रीतसोबत तिची भेट झाली.
Web Title: Jasprit Bumrah Sanjana Ganesan blessed with baby boy photo shared on Instagram baby name is Angad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.