Join us  

टीम इंडियासाठी खुशखबर! जसप्रीत बुमराहच्या 'कमबॅक'चा मुहूर्त ठरला, लवकरच होणार घोषणा

Japsrit Bumrah comeback: तब्बल एक वर्षाहून जास्त वेळ बुमराह क्रिकेटपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 7:17 PM

Open in App

Jasprit Bumrah comeback for Team India: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील जवळपास एक वर्षापासून पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त आहे. अलीकडेच, बीसीसीआयने त्याच्याबद्दल हेल्थ अपडेट देखील जारी केले होते. तो बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत आहे आणि लवकरच पुनरागमन करू शकतो असे यात सांगण्यात आले होते. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये नवीन गोष्ट समोर आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, बुमराह पुढील महिन्यात आयर्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेतून टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकतो.

या आठवड्यात संघाची घोषणा होऊ शकते...

भारताला पुढील महिन्यात १८ ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. दुसरा T20 सामना 20 ऑगस्टला आणि तिसरा T20 सामना 23 ऑगस्टला खेळवला जाईल. तिन्ही सामने डब्लिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळवले जातील. रिपोर्टनुसार, या आठवड्यात आयर्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा होऊ शकते. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती आशिया चषक आणि विश्वचषक पाहता या T20 मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. त्याचबरोबर काही आयपीएल स्टार्सना खेळण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर बुमराहही या दौऱ्यातून संघात परतू शकतो.

मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती

या वर्षी मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आणि गेल्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या T20I मालिकेनंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी केलेल्या टाइमलाइननुसार, बुमराह आधी ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठीच परतण्याची अपेक्षा होती. मात्र, बीसीसीआयने मेडिकल अपडेट जारी करून बुमराह लवकरच तंदुरुस्त होण्याची आशा व्यक्त केली आहे.

बुमराहमुळे मिशन वर्ल्ड कप साठी भारताला होणार फायदा

बुमराहची आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाल्यास हा त्याचा दुसरा दौरा असेल. यापूर्वी तो 2018 मध्ये आयर्लंडला खेळला होता. त्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर तो इंग्लंड दौऱ्याला मुकला. बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताच्या विश्वचषक तयारीलाही फायदा होईल. त्याचबरोबर मोहम्मद शमीही आशिया कपसाठी टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघआयर्लंडबीसीसीआय
Open in App