Join us  

जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांच्या फिटनेसबाबत मोठे अपडेट्स, दोघांचे लवकरच पुनरागमन 

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे तो कसोटीनंतर वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकाही खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 5:56 PM

Open in App

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे तो कसोटीनंतर वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकाही खेळणार आहे. जसप्रीत बुमराह अय्यर, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि टीम इंडियातून बाहेर पडलेल्या प्रसिद्ध कृष्णा यांच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. वेगवान गोलंदाज बुमराह आणि फलंदाज श्रेयस अय्यर आयर्लंड दौऱ्यातून टीम इंडियात पुनरागमन करू शकतात.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज श्रेयस अय्यर आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेद्वारे टीम इंडियात परतणार आहेत. यासाठी बुमराहने गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. बुमराहशिवाय अय्यरनेही नेटमध्ये फलंदाजी सुरू केली आहे. अय्यर सध्या एनसीएमध्ये आहे आणि पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पाठदुखीमुळे अय्यरला यंदाही आयपीएलपासून दूर राहावे लागले. यानंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही सहभागी होऊ शकला नाही. मात्र, आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की तो सराव सत्रात भाग घेत आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका ऑगस्टमध्ये खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. बुमराह आणि अय्यर व्यतिरिक्त केएल राहुल देखील एनसीसीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. पुढील आठवड्यात तो फलंदाजीची सुरुवात करेल. तो मैदानात कधी परतणार हे स्पष्ट झाले नसले तरी. आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप यांच्यामध्ये बराच वेळ आहे, त्यामुळे राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच वर्ल्ड कप स्पर्धेतून पुनरागमन करू शकेल, असे मानले जात आहे. आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीच्या लीग सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडीला दुखापत झाल्यापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहश्रेयस अय्यरलोकेश राहुल
Open in App