IND vs AUS Test Series: Jasprit Bumrah Injury : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता बळावली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने बुमराह किमान शेवटच्या दोन कसोटी सामन्यांत खेळेल, अशी आशा व्यक्त केली होती. पण, BCCI च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बुमराह जोपर्यंत शंभर टक्के तंदुरुस्त होत नाही, तोपर्यंत त्याचे पुनरागमन शक्य नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहे. पण, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळू शकतो. तसेही न झाल्यास तो थेट इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधून मैदानावर पुनरागमन करू शकेल.
Women's Premier League इनसाईड स्टोरी; काव्या मारनचा होता 'मुंबई'वर डोळा, अंबानींची ८ संघांवर बोली!
''ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी जसप्रीत बुमराह १०० टक्के तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच आहे. त्याला खेळवण्याची घाई आम्ही करणार नाही. पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी बराच कालावधी लागतो. सध्याच्या घडीला तो तंदुरुस्त आहे आणि निवडीसाठी तयार आहे. पण, त्याच्या खेळण्यावर अजूनही संभ्रम आहे. कदाचित आणखी एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्ट्सला सांगितले.
भारताला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी निवड समितीने बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळवण्याची घाई केली. त्यानंतर बुमराहची दुखापत अधिक बळावली अन् त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मधून माघार घ्यावी लागली. ''जसप्रीत बुमराहच्या दुखापत कितपत बरी झाली आहे याची कल्पना नाही. पण, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. पाठीचं दुखणं हे खूपच गंभीर असते आणि आम्हाला त्याच्याबाबत कोणताच धोका पत्करायचा नाही. त्या मालिकेनंतरही बरंच क्रिकेट खेळायचे आहे,''असे रोहित म्हणाला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. त्यात जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आलेला नाही. बुमराह सध्या NCA मध्ये आहे आणि तो १०० टक्के तंदुरुस्त झाल्यानंतरच पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
भारताचा कसोटी संघ ( वि. ऑस्ट्रेलिया, फक्त दोन सामन्यांसाठी ) - रोहित शर्मा ( कर्णधार) , लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"