Join us  

Jasprit Bumrah Wedding : संजना गणेशनसोबत लग्नाचे वृत्त असताना व्हायरल झाला जसप्रीत बुमराहचा 'तो' Video

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan old Video goes viral एका वेबसाईटच्या वृत्तानुसार संजना आणि जसप्रीत यांचे लग्न ( Jasprit Bumrah Marriage) गोवा येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 11:52 AM

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानं वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी माघार घेतली. चौथ्या कसोटीनंतर बुमराहनं पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेतही सुट्टी घेतली आहे. त्यानं ही सुट्टी लग्नासाठी घेतल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. जसप्रीत बुमराह १४ व १५ मार्चला गोव्यात स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन ( Sanjana Ganeshan) हिच्यासोबत लग्न करणार आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असताना संजना व जसप्रीत यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला धुळ चारणार; जाणून घ्या कधी व केव्हा भिडणार!

SportsKreeda या वेबसाईटच्या वृत्तानुसार संजना आणि जसप्रीत यांचे लग्न ( Jasprit Bumrah Marriage) गोवा येथे होणार आहे. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओत संजना भारतीय गोलंदाजाची मुलाखत घेत आहे.  आशिया चषक स्पर्धेत लोकेश राहुलकडे टीम इंडियाचं नेतृत्व; BCCI टीम B मैदानावर उतरवणार, जाणून घ्या Playing XI

पाहा व्हिडीओ.

 

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशनभारतीय क्रिकेट संघ