नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोटा झटका बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी विश्वचषकातून बाहरे झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बुमराह भारतीय संघाचा हिस्सा होता. मात्र मालिकेतील पहिल्याच सामन्यात दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. सराव सत्रात झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती.
माहितीनुसार, जसप्रीत बुमराहची गंभीर दुखापत असल्यामुळे त्याला बरे होण्यासाठी 4 ते 6 महिने लागू शकतात. या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आशिया चषकही खेळू शकला नव्हता. जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर झाल्यामुळे मोठा झटका बसला आहे. काही चाहते हा भारतीय संघाचा पराभव असल्याचे म्हणत आहेत. तर काहींनी जसप्रीत बुमराहला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
बुमराह चाहत्यांच्या निशाण्यावर जसप्रीत बुमराहच्या आयपीएलच्या कारकिर्दीबद्दल भाष्य केले तर, 2016 पासून बुमराहाने आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील प्रत्येक सामना खेळला आहे. मागील 7 वर्षात जसप्रीत बुमराहने एकूण 103 आयपीएल सामने खेळले आहेत. बुमराहने आयपीएल 2016 मध्ये 14, 2017 मध्ये 16, 2018 मध्ये 14, 2019 मध्ये 16, 2020 मध्ये 15, 2021 मध्ये 14, 2022 मध्ये 14 सामने खेळले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलमधील सामने खेळताना बुमराहला एकदाही दुखापत झाली नव्हती. याचाच दाखला देत चाहते त्याच्या खेळीवर निशाणा साधत आहेत.
जसप्रीत बुमराहचे IPL मधील प्रदर्शन
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
- 23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
- 27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
- 30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
- 2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
- 6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
- १३ नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"