Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: भारताने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्पोर्ट्स अँकर म्हणून तिने अनेकांच्या मुलाखती घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 05:25 PM2024-07-03T17:25:41+5:302024-07-03T17:27:01+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah wife sanjana ganesan slams fake twitter x account stolen identity pictures t20 world cup 2024 | Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सिंहाचा वाटा उचलला. त्याला या कामगिरीबाबत मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. पण जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिच्याबाबत एक वाईट गोष्ट घडली आहे. संजना सध्या बार्बाडोसमध्ये पती जसप्रीत बुमराह आणि टीम इंडियासोबत आहे. भारताने T20 World Cup 2024 जिंकल्यानंतर स्पोर्ट्स अँकर म्हणून तिने अनेकांच्या मुलाखती घेतल्या. टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर बुमराह आणि संजना यांचे अनेक भावुक क्षण कॅमेराने टिपले होते. यातील काही क्षणांचे फोटो एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केले आणि फेक अकाऊंट म्हणजे संजना असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर तिच्या नावे एक फेक अकाउंट दिसून आले आहे. या अकाऊंटवर कपलचे फोटो शेअर केले जात आहेत.

संजनाच्या नावे एका ट्विटर एक्स अकाउंट हँडलवरून जोडप्याचे फोटो शेअर केले आहेत. यावर संजनाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले- हॅलो, ही एक चोरलेली ओळख आणि चोरलेले फोटो आहेत. मी तुमचे खाते रिपोर्ट केले आहे. लवकरात लवकर चोरलेली ओळख आणि फोटो काढून टाका, नाहीतर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल.

दरम्यान, संजनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून टीम इंडिया आणि बुमराहचे कौतुक केले. "मला जे काही वाटले, जे काही घडले आणि जे माझ्या मनात आले ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. हे सर्व अजूनही स्वप्नासारखे वाटते, परंतु संघाने जे काही केले ते पाहणे खूप साऱ्या कौतुकास पात्र आहे. तुम्ही सारे वर्ल्ड चॅम्पियन आहात!!

"चिकाटी, परिश्रम आणि प्रतिभेचे प्रतीक असलेला जसप्रीत बुमराह.. तू सूर्य, चंद्र आणि आकाशातील तारे यांच्याप्रमाणेच अढळ आहेत. तू जे काही सहन केले, कष्ट केले, दररोज सुधारणा करण्यासाठी धडपड केली, तो प्रवास प्रेरणादायी आहे. अंगद आणि मी दोघेही भाग्यवान आहोत की तू आमच्या आयुष्याचा भाग आहेस. खूप अभिनंदन!" अशी इन्स्टाग्राम पोस्ट संजनाने केली आहे.

Web Title: Jasprit Bumrah wife sanjana ganesan slams fake twitter x account stolen identity pictures t20 world cup 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.