भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह ( Jasprit Bumrah) कधी, केव्हा व कुणाशी लग्न करणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं अखेर मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी जसप्रितनं ( Jasprit Bumrah Wedding ) सुट्टी घेतली. त्यानं ही सुट्टी लग्नासाठी घेतल्याचे वृत्त नंतर समोर आलं. तेव्हापासून जसप्रितची होणारी पत्नी कोण, या चर्चेत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन ( anupama parameswara ) हिचं नाव आघाडीवर होतं. पण, अनुपमाच्या आईनं हे वृत्त फेटाळून लावल्यानं पुन्हा जसप्रीतची होणारी पत्नी कोण, असेच ही चर्चा सुरू झाली. जसप्रीत बुमराहची 'नवरी' राजकोटसाठी रवाना; दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत घेणार सात फेरे?
कोण आहे संजना गणेसन ?संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, ६ सामन्यांत ६७३* धावा अन् कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी