Join us  

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार?; दुखापतीबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स, Video  

Jasprit Bumrah will miss the Asia Cup - भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 5:29 PM

Open in App

Jasprit Bumrah will miss the Asia Cup - भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली. अर्षदीप सिंग व आवेश खान या युवा गोलंदाजांवर आशिया चषक स्पर्धेत जसप्रीतची उणीव भरून काढण्याची जबाबदारी आहे. 27 ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धेला यूएईत सुरुवात होत आहे. भुवनेश्वर कुमारसारख्या अनुभवी गोलंदाजाच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडू प्रतिस्पर्धी फलंदाजांना हैराण करण्यासाठी सज्ज आहेत. जसप्रीत व मोहम्मद शमी हे दोन अनुभवी खेळाडू आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाहीत.  

शमीला का वगळले, याचं उत्तर निवड समितीने दिलेलं नाही. त्यात आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शमी निवड समितीच्या विचारात नाही. पण, जसप्रीतची दुखापत शमीचा विचार करण्यात त्यांना भाग पाडू शकते. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत मैदानाबाहेर आहे आणि तो वर्ल्ड कप पर्यंत तंदुरुस्त होण्यासाठी BCCI च्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला आहे. जसप्रीतने त्याच्या दुखापतीचे अपडेट्स देणारा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

NCA मध्ये असलेला जसप्रीत कसून मेहनत करताना दिसतोय. कोणताही अडथळा आता मोठा नाही, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.  

हर्षल पटेलही आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाहीय, बरगडीची दुखापत बळावल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. तोही जसप्रीतसह NCA मध्ये आहे. 

टॅग्स :जसप्रित बुमराहएशिया कपट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App