मुंबई - आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याच्या शिरपेचात अजून एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षभरात बुमराहने केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी बीसीसीआयने त्याला 2018-19 या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणारा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर केला आहे. आज मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात बुमराहला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जसप्रीत बुमराहने आपल्या आंतराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात 2016 मध्ये केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 58 एकदीवसीय सामन्यात 103 बळीटिपले आहेत. तर 44 ट्वेंटी-20 सामन्यात 53 फलंदाजांची शिकार केली आहे. तसेच बुमराहने 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत 12 कसोटी सामन्यात 62 बळी टिपले आहेत. या काळात त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
जसप्रीत बुमराहचा दे धक्का; आर अश्विन, चहल यांचा मोडला विक्रम
भारतीय संघात जसप्रीत बुमराह 'यॉर्कर किंग', तर कोण आहे 'क्वीन', पाहा धमाकेदार व्हिडीओ...
दिसतं तसं नसतं! जसप्रीत बुमराहने केला लसिथ मलिंगाबाबत मोठा खुलासा
2018 ते 2019 या काळात जसप्रीत बुमराने 6 कसोटी सामन्यात 34 तर 17 एकदिवसीय सामन्यात 31 बळी टिपले. तर 7 ट्वेंटी-20 सामन्यात 8 बळी टिपले आहेत. 2019 मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतही त्याची कामगिरी लक्षवेधी ठरली होती.