भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्स यांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah Injury) दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. सुरुवातीला तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतून पुनरागमन करेल असे सांगण्यात येत होते. पण, BCCI ने जाहीर केलेल्या वन डे संघात त्याचे नाव नाही. त्यानंतर तो थेट इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मध्ये खेळेल अशी चर्चा रंगली. पण, २८ वर्षीय गोलंदाजाला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे आणि अशात तो IPL 2023 सह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( WTC Final 2023 ) फायनलही खेळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुमराह ७ महिने क्रिकेटपासून दूर आहे आणि आता तो थेट वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
जसप्रीत बुमराह आयपीएलमधून कमबॅक करेल असा अंदाज होता, परंतु क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार त्याला तंदुरुस्तीसाठी आणखी बराच कालावधी लागू शकतो. सप्टेंबर २०२२ मध्ये बुमराह टीम इंडियाकडून शेवटचा खेळला होता आणि त्यानंतर तो पाठीच्या दुखापतीवर उपचार घेतोय. भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वन डे मालिकेसाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने तंदुरूस्त सर्टिफिकेट दिलेले नाही. बुमराहला अजूनही पूर्णपणे बरा होत असल्याचे वाटत नाहीए. त्याच्याबाबत बीसीसीआयसला कोणताच धोका पत्करायचा नाही. मागच्या वेळेस अशीच घाई केली अन् त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जसप्रीत बुमाराह , जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल
MI full schedule in IPL 2023 :
२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा. पासून
८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
११ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी ७.३० वा. पासून
१६ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून
१८ एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद - सायंकाळी ७.३० वा.पासून
२२ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
२५ एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद - सायंकाळी ७.३० वा.पासून
३० एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
३ मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली - सायंकाळी ७.३० वा.पासून
६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून
९ मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
१२ मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
१६ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी ७.३० वा.पासून
२१ मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: ‘Jasprit Bumrah will take longer to recover than expected’, say official; MAJOR BLOW for Mumbai Indians & Team India, Bumrah likely OUT of IPL 2023 & WTC Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.