"जसप्रीत बुमराहला मी कुठलंही रेटिंग देणार नाही; तो जर अ‍ॅलन बॉर्डरसमोर खेळला असता तर..."

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ॲडम गिलख्रिस्टने असे विधान केले आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:15 IST2025-01-14T17:14:44+5:302025-01-14T17:15:45+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah would have even troubled Sir Don Bradman said Adam Gilchrist | "जसप्रीत बुमराहला मी कुठलंही रेटिंग देणार नाही; तो जर अ‍ॅलन बॉर्डरसमोर खेळला असता तर..."

"जसप्रीत बुमराहला मी कुठलंही रेटिंग देणार नाही; तो जर अ‍ॅलन बॉर्डरसमोर खेळला असता तर..."

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jasprit Bumrah vs Allan Border: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या कसोटीत जगातील नंबर-१ गोलंदाज आहे. सध्या सक्रीय असलेल्या गोलंदाजांपैकी त्याची गणना जगातील महान गोलंदाजांमध्ये केली जाते. अलीकडेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून अत्यंत घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. तो या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. या दौऱ्यात त्यांच्या बाजूने ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियन दिग्गजांनीही त्याचे खूप कौतुक केले. पण आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ॲडम गिलख्रिस्टने असे विधान केले आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

क्रिकेटच्या जगतात जेव्हा जेव्हा महान फलंदाजांची चर्चा होते, तेव्हा क्रिकेटचा 'डॉन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉन ब्रॅडमनची चर्चा नक्कीच होते. या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने आपल्या दौऱ्यात खूप धावा केल्या होत्या आणि कसोटीत त्याची सरासरी ९९.९ इतकी होती. त्याचा हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. पण ॲडम गिलख्रिस्टचे मत आहे की डॉन ब्रॅडमनने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना केला असता, तर त्याची सरासरी इतकी चांगली राहिली नसती. त्या काळात बुमराह असता तर त्याने सर डॉन ब्रॅडमन यांनाही त्याची गोलंदाजी खेळताना अडथळा आला असता. थोडक्यात काय तर, डॉन ब्रॅडमनसारखा दिग्गजही बुमराहसमोर फ्लॉप झाला असता असं तो म्हणाला.

बुमराहबद्दल बोलत असताना ॲडम गिलख्रिस्ट पॉडकास्टमध्ये म्हणाला, "मी त्याला रेटिंग देत नाही, जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या रेटिंगसाठी कोणताही नंबर योग्य नाही. त्याने अगदी ब्रॅडमनलाही टक्कर दिली असती. ब्रॅडमनने बुमराहचा सामना केला असता तर त्याची फलंदाजीची सरासरी खूपच कमी राहिली असती. मला वाटतं बुमराहच्या फलंदाजीच्या समोर त्याची सरासरी ३५ ची असती."

दरम्यान, या नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरी करून दाखवली. त्याने पाच सामन्यांच्या नऊ डावात ३२ बळी घेतले. दुखापतीमुळे तो शेवटच्या सामन्याच्या शेवटच्या डावात गोलंदाजी करू शकला नाही, अन्यथा विकेट्समध्ये आणखी वाढ होऊ शकली असती. या संस्मरणीय कामगिरीसाठी त्याला मालिकावीर म्हणूनही गौरवण्यात आले.

Web Title: Jasprit Bumrah would have even troubled Sir Don Bradman said Adam Gilchrist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.