Jasprit Bumrah Sanjana Ganesan Anniversary: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या लग्नाला आजच्याच दिवशी वर्ष पूर्ण झालं. वर्षभरापूर्वी १५ मार्चला बुमराह आणि संजना गणेशन विवाहबंधनात अडकले. आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त जसप्रीत बुमराहने एक अतिशय रोमँटिक पोस्ट लिहिली. बुमराह आणि संजनाने गोव्यात कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका खाजगी समारंभात लग्न होतं.
लग्नाची व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करताना बुमराहने लिहिले की, 'जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा आयुष्य अधिक चांगले असते. आजटा दिवस हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने योग्य आहे. तू सोबत असलीस की मला अधिक आनंदी, मजेदार आणि अधिक शांत वाटतं. तुझ्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ आणि स्थैर्य आलं आहे. एक वर्ष म्हणजे मी तुझ्यासोबत घालवलेल्या वेळेचा एक छोटासा भाग आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. लव्ह यू.'
२८ वर्षीय बुमराह आता IPL 2022 साठी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. तर संजना सध्या महिला विश्वचषकासाठी न्यूझीलंडमध्ये आहे. नुकतेच बंगळुरू येथे झालेल्या गुलाबी चेंडू कसोटीत श्रीलंकेचा पराभव करणाऱ्या भारतीय संघात बुमराह होता. वेगवान गोलंदाजाने पहिल्या डावात पाच विकेट्स घेऊन विक्रम रचला. ही त्याची मायदेशात पहिलीच कामगिरी होती.