टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानं सोमवारी ( 15 मार्च) स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत लग्न केलं. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत गोव्यात हा लग्न सोहळा पार पडला. सध्याच्या घडीतील जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीतच्या माऱ्यासमोर भलेभले फलंदाज अडखळलेले पाहायला मिळले आहेत. पण, पुणेकर संजनानं भारतीय गोलंदाजाची विकेट काढली अन् थाटात दोघांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली.
बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह जसप्रीत बुमराह याचाही ग्रेड A+ मध्ये समावेश आहे. म्हणजे वर्षाला त्याला बीसीसीआयकडून 7 कोटी इतका पगार मिळतो. त्याशिवाय आयपीएल आणि अन्य ब्रँड्सकडून त्याला मिळणारे उत्पन्नही अधिक आहे.
६ डिसेंबर १९९३मध्ये जसप्रीतचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद येथे झाला. तो पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे जस्बीर सिंग यांचे निधन झाले. त्यानंतर आई दलजीत बुमराह हिनं त्याचा सांभाळ केला. त्या अहमदाबाद येथील शाळेत शिक्षिका होत्या. त्यांनी जसप्रीतचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि आज तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.
जसप्रीत बुमराहनं आता आयुष्यात नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशनसोबत त्यानं लग्न केलं आहे. आता तो इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतही खेळण्याची शक्यता कमी आहे. जसप्रीत पत्नी संजना सोबत अहमदाबाद येथील आलिशान घरात राहणार आहे. पाहा त्याच्या घराचे फोटो व व्हिडीओ...