ठळक मुद्देसंजना गणेशनसोबत लगीनगाठ बांधून बुम बुम बुमराह आता महाराष्ट्राचा जावई झाला आहे.२०१७ मध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देणारं ट्विट करताना बुमराहनं #saynotocrackers हा हॅशटॅग वापरला होता.जसप्रीत-संजनाचे नातेवाईक फुलबाज्या धरून उभे असल्याचं फोटोत दिसतंय.
टीम इंडियाचा स्टार तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या 'सातवे आसमां पर' आहे. त्यानं आयुष्यातील एका नव्या इनिंग्जची सुरुवात केलीय. ही इनिंग्ज म्हणजे त्याचं 'शुभमंगल'. टीव्ही स्पोर्ट्स प्रेझेन्टर संजना गणेशनसोबत लगीनगाठ बांधून बुम बुम बुमराह आता महाराष्ट्राचा जावई झाला आहे. संजनासोबतचे दोन 'लय भारी' फोटो बुमराहनं शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर केलेत. पण, त्यातला एक फोटो बुमराहला जरा जास्तच 'भारी' पडलाय. या फोटोत दिसणाऱ्या फुलबाज्या पाहून काही नेटिझन्स बुमराहच्या नावानं फटाके फोडत आहेत. (Jasprit Bumrah Trolling)
जसप्रीत बुमराह- संजना गणेशन यांच्या लग्नाचे Unseen फोटो अन् Video
जसप्रीतनं संजनासोबत १५ मार्चच्या मुहूर्तावर 'सात फेरे' घेतले. मोजक्या २० जणांच्या उपस्थितीत गोव्यात हा लग्नसोहळा झाला. या लग्नाचे दोन फोटो बुमराहनं सोशल मीडियावर शेअर केले होते. ''योग्य प्रेम आपल्याला योग्य मार्ग दाखवतं. आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपुरा आहे'', अशा भावना बुमराहनं व्यक्त केल्या होत्या. त्यावर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
जसप्रीत बुमराहचा कधी न पाहिलेला अंदाज; रोमँटिक पोझमध्ये दिसतोय हिरो!
त्यानंतर, काल बुमराहनं पुन्हा दोन फोटो पोस्ट केले. शुभेच्छा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार मानणारी ही पोस्ट आहे. त्यातलाच एक फोटो बुमराहसाठी डोकेदुखी ठरतोय. दोन्ही बाजूंना नातेवाईक उभे आहेत. त्यांनी हातात फुलबाज्या धरल्यात आणि जसप्रीत-संजना मधून चालत येत आहेत, असं दृश्य त्या फोटोत दिसतंय. ते पाहून काही नेटकऱ्यांना बुमराहनं २०१७ च्या दिवाळीत केलेलं एक ट्विट आठवलं आणि शुभेच्छांच्या पुरासोबत टीकेचा धूरही निघाला.
चर्चा रंगली बुमराहच्या संजना गणेशनची, गुगलवर होतेय सर्च; जाणून घ्या ती नेमकी आहे तरी कोण?
१९ ऑक्टोबर २०१७ रोजी दिवाळीच्या शुभेच्छा देणारं ट्विट करताना बुमराहनं #saynotocrackers हा हॅशटॅग वापरला होता. फटाके नको म्हणणारा बुमराह या फोटोमध्ये संजनासोबत फुलबाज्यांच्या धुरामधून चालताना दिसतोय, हे नेटिझन्सना खटकलं आणि त्यांनी बाऊन्सर, यॉर्करचा मारा सुरू केला. हा तर सरळ सरळ दुटप्पीपणा आहे, ढोंगीपणा आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स बुमराहच्या पोस्टवर करण्यात आल्यात.
जसप्रीत बुमराहच्या 'या' आलिशान घरात राहणार नववधु संजना गणेशन, See Photo
एकूणच, सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीवर सोशल मीडियाचं बारीक लक्ष असतं आणि त्यांनी जरा जरी गडबड केली तरी ट्रोलिंग नक्की असतं, हे या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झालंय. ते चूक की बरोबर, हा तर गहन चर्चेचाच विषय आहे.
Web Title: Jasprit Bumrah’s say no to crackers tweet resurges after he shares his wedding pics
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.