Join us  

पाकिस्तानच्या आफ्रिदीनं बुमराहच्या 'लेका'ला काय दिलं होतं खास गिफ्ट? संजनानं केला खुलासा

आज रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 6:29 AM

Open in App

India vs Pakistan Match : क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच. आज रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये होत असलेल्या या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने एक खुलासा करून चाहत्यांचे लक्ष वेधले. आशिया चषक २०२३ च्या स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी खेळाडू शाहीन शाह आफ्रिदीने बुमराहला एक भेट दिली होती. पण यामध्ये नेमके काय होते याबाबत कोणालाच माहिती झाले नाही. आता संजनाने याबाबत भाष्य केले आहे. 

आशिया चषकाच्या साखळी फेरीत जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे धुवून निघाला तेव्हा शाहीनने बुमराहला एक भेटवस्तू दिली. बुमराह नुकताच बाबा झाल्यामुळे शाहीनने त्याला भेट म्हणून बॉक्समध्ये काहीतरी दिले. त्यावेळी बुमराह नुकताच श्रीलंकेत दाखल झाला होता. कारण तो बाबा होणार असल्याकारणाने काही दिवसांसाठी मायदेशात परतला होता.

बुमराहच्या पत्नी केला खुलासा'द ग्रेड क्रिकेटर युट्यूब' चॅनेलवर बोलताना संजनाने सांगितले की, शाहीनने दिलेल्या बॉक्समध्ये कोणते गिफ्ट नव्हते. त्यामध्ये एक संच होता, ज्यामध्ये अनेक गोष्टी होत्या, ज्यांचा वापर अंगद आजही करतो. याशिवाय संजनाने भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्याबद्दल म्हटले की, मैदानात हा संघर्ष होणे साहजिकच आहे, पण मैदानाबाहेर असे होता कामा नये, असे मला वाटते. दरम्यान, आशिया चषकाच्या स्पर्धेदरम्यान शाहीन आफ्रिदीने बुमराहला भेट दिल्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. दोन्ही देशातील चाहत्यांची मनं जिंकण्यात शाहीनने यश मिळवले. 

कोण आहे बुमराहची पत्नी संजना गणेसन?जसप्रीत बुमराह १५ मार्च २०२१ ला स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला. संजना गणेसन मॉडेल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिने अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरिंग केले आहे. संजनाने २०१९च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केले होते. सिम्बॉससिस इंस्टीट्यूटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केले. त्यात तिने गोल्ड मेडल पटकावले. त्यानंतर २०१३-१४मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केले.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानऑफ द फिल्ड