कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद. कारण पाकिस्तानकडून खेळत असताना इम्रान यांचा सर्वाधिक विश्वास मियाँदाद यांच्यावर होता. इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी भारताविरुद्ध युद्धाची भाषा केली होती. आता त्यांच्या पावलावर पाऊल मियाँदाद टाकत असल्याचे दिसत आहे.
मियाँदाद यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. मियाँदाद या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत की, " काश्मीरमधील बंधूंनो, तुम्ही काहीही काळजी करू नका. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मी यापूर्वी बॅटने षटकार मारलेले आहेत, आता यावेळी तलवारचाही प्रयोग करू शकतो."
मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड
पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद हा ठळकपणे दोन गोष्टींसाठी कायमचा लक्षात राहतो. एक म्हणजे, त्याने मारलेला चेतन शर्माला अखेरच्या चेंडूवर षटकार. दुसरी गोष्ट म्हणजे, 1992 च्या विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने माकडासारख्या उड्या मारल्या होत्या. सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या वातावरणामध्ये जावेद काही खेळाडूंसह काश्मीरच्या LOC वर परेड करणार आहे. जावेदने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जावेद हा चांगला मित्र आहे. त्यामुळे आता काही गोष्टी इम्रान यांना करायला जमणार नाही. त्यामुळे त्यांनी आता जावेद यांची मदत घेण्याचे ठरवले आहे, असे म्हटले जात आहे. जावेद हे काही खेळाडूंबरोबर LOC वर जाऊन शांततेचा झेंडा फडकवणार आहेत.
LOC वर जाऊन शांततेचा झेंडा फडकावून जावेद नेमकं काय साध्य करणार, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जावेद हे LOC वर जाऊन शांततेचा झेंडा फडकावून संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची वेगळी छबी उभारण्यास मदत करणार आहे. इम्रान यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये आपली छबी सुधारण्यासाठी जावेद यांची मदत घेतल्याचे म्हटले जात आहे.
Web Title: Javed Miandad talking about war against India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.