Javed Miandad's insensitive remark - पाकिस्तानमध्ये होणार्या आशिया चषक स्पर्धेतील टीम इंडियाच्या सहभागाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. BCCI ने कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवणार नाही, हे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने या प्रकरणावर अत्यंत असंवेदनशील भूमिका मांडली आहे. दोन राष्ट्रांमधील राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध अद्यापही ठप्प असल्याने आशिया चषकाच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ही स्पर्धा पाकिस्तानातच होण्याची शक्यता आहे, परंतु भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होतील.
बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात याबाबत वाद सुरू आहेत. यापूर्वी, पीसीबीने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती, परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांची भूमिका मवाळ झाली आहे. आयसीसीच्या सूत्रांनुसार, पाकिस्तान त्यांचे वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने कोलकाता आणि चेन्नईमध्ये खेळण्यास प्राधान्य देऊ शकतो. या संपूर्ण वादाच्या दरम्यान, मियाँदादच्या असंवेदनशील टिप्पणीमुळे प्रकरण आणखी बिघडणार हे निश्चित आहे.
नादिर अली पॉडकास्टवरील एका एपिसोडवर 'सुरक्षेच्या' कारणास्तव भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याबद्दल मियाँदाद यांना मत विचारण्यात आले, ज्यावर माजी कर्णधार म्हणाले,"सुरक्षा विसरून जा. "आमचा विश्वास आहे की अगर मौत आनी है तो आनी... जिंदगी और मौत तो अल्लाह के हाथ में है " (जर तुमची नशिबात मरणे असेल तर तुम्ही मराल. जीवन आणि मृत्यू अल्लाहच्या हातात आहे. ) त्यांनी आज आम्हाला बोलावले तर आम्ही जाऊ. पण त्यांनीही इथे खेळायला यावे. आम्ही गेल्या वेळी गेलो होतो, पण तेव्हापासून ते इथे आले नाहीत. आता त्यांची वेळ आहे."
२००८च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यापासून, भारताने पाकिस्तानशी आपले सर्व क्रिकेट संबंध तोडले आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही आणि केवळ भारत-पाकिस्तान सामने आयसीसी स्पर्धा आणि आशिया कप दरम्यान होतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"