ICC Meeting Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) चे सचिव जय शाह यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) मोठी जबाबदारी मिळाली आहे. जय शाह यांना आयसीसीच्या मेन्स क्रिकेट कमेटीमध्ये मेम्बर बोर्ड प्रतिनिधी (Member Board Representative) म्हणून नियुक्त करण्यात आलंय. रविवारी पार पडलेल्या आयसीसीच्या त्रैमासिक बैठकीत यासंदर्भातील घोषणा करण्यात आली.
कोण आहेत सदस्य?
महेला जयवर्धने (पुन्हा नियुक्ती)
गॅरी स्टीड - राष्ट्रीय टीमचे कोच प्रतिनिधी
जय शाह - मेंबर बोर्ड प्रतिनिधी
जोएल विल्सन - आयसीसी एलिट पॅनल अम्पायर
जेमी कॉक्स - एमसीसी प्रतिनिधी
टी २० विश्वचषकाबाबत निर्णय
आयसीसी मेन्स टी २० विश्वचषक २०२४ साठी १२ संघांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. २०२२ च्या विश्वचषकात पहिल्या आठ संघांना, यजमान देश (वेस्टइंडिज, युएसए) सोडून टी २- रॅकिंगमधील पुढील सर्वोच्च रँक असलेल्या टीम्स सहभागी होती. जर वेस्ट इंडिज पहिल्या आठ क्रमांकांमध्ये असेल, तर रँकिंगच्या आधारे तर रँकिंगच्या आधारावर तीन टीम्स पुढे जातील.
उर्वरित आठ स्थानांचा निर्णय रिजनल क्वालिफिकेशन प्रक्रियेच्या माध्यमातून केला जाईल. यामध्ये आफ्रिका, आशिया आणि युरोपमधून दोन दोन टीम्स आणि अमेरिका, ईएपीमधून एक एक टीम सहभागी होईल. याशिवाय आयसीसी महिला टी २० विश्वचषक २०२४ साठी क्वालिफिकेशन प्रक्रियेवरही सहमती झाली.
रमीझ राजांना झटका
तर दुसरीकडे पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्या चार देशांदरम्यान (भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया) टुर्नामेंट करण्याच्या प्रस्तावाला आयसीसीनं सर्वानुमते फेटाळलं आहे.
Web Title: jay shah in icc Member Board Representative of ICC Cricket Committee Pakistan ramiz raja world cup icc meeting bcci
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.