Join us  

हा प्रवास इथेच संपला असला तरी...! भारतीय संघाच्या पराभवानंतर जय शाह यांची लांबलचक पोस्ट

भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 7:03 PM

Open in App

भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. संपूर्ण स्पर्धेत १० सामने जिंकून अपराजित असलेल्या वाघाची फायनलमध्ये शेळी झालेली जगाने पाहिलं. ऑस्ट्रेलियाने चिवट खेळ करून ६ विकेट्स राखून विजय मिळताना सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला. या पराभवाचं दुःख भारतीयांच्या मनात कायम राहणार आहे. स्पर्धेत सर्वकाही चांगला सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या अचूक डावपेचांसमोर भारतीय खेळाडू अडखळले. या पराभवानंतर भारतीय संघातील काही खेळाडूंनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनीही लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

त्यांनी लिहिले की, भारतीय संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी कमी पडला असला तरी त्यांचा इथवरचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. भारतीय संघाने खेळलेला प्रत्येक सामना हा संघाच्या अविचल आत्मा, दृढनिश्चय आणि कौशल्याचा पुरावा देणारा ठरला. अंतिम फेरीपर्यंत सर्व १० सामने जिंकून त्यांनी क्रिकेटचे खरे सार दाखवले. हा खेळ जितका सुंदर आहे तितकाच अप्रत्याशितही आहे. संपूर्ण देश या खेळाडूंच्या पाठीशी आहे. या वर्ल्ड कपचे भारतीय संघाने देशव्यापी उत्सवात रुपांतर केले. संपूर्ण देशाची ऊर्जा, उत्कटता आणि अखंड पाठिंबा खरोखरच अविश्वसनीय होता.

टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचे समर्पण, कठोर परिश्रम आणि चिकाटीने या संपूर्ण स्पर्धेत निखळ आनंदाचे क्षण दिले आहेत. तुम्ही फक्त तुमच्या विजयांनीच नव्हे तर ज्या पद्धतीने तुम्ही खेळ खेळलात त्या वृत्तीने तुम्ही आम्हाला अभिमान वाटला आहे. हा वर्ल्ड कप केवळ जिंकण्यापुरता नव्हता; ते भावना, सौहार्द आणि टीम इंडियाच्या अदम्य भावनेबद्दल होता. आनंद आणि अविस्मरणीय क्षणांबद्दल धन्यवाद. हा भारतीय संघ प्रत्येक अर्थाने खरे चॅम्पियन्स. प्रवास संपला असेल, पण आमच्या संघाबद्दलचा अभिमान आणि प्रेम कायम राहील.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपजय शाहभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया