नवी दिल्ली : भारतीय संघ 2023मध्ये आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अशातच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत मोठे वक्तव्य करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पाकिस्तानच्या धरतीवर पुढील आशिया चषक त्रयस्थ ठिकाणी खेळविण्याची आमची मागणी असेल. असे आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी म्हटले आहे. खरं तर यापूर्वी 2008 साली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर या शेजारील राष्ट्रांमध्ये ना दौरे झाले ना कोणतील मालिका झाली. मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांशी संबंध तोडले. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात.
जय शाह यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "आशिया चषक 2023 ची स्पर्धा आम्ही तटस्थ ठिकाणी खेळू. आमचा संघ पाकिस्तानमध्ये खेळणार का याला परवानगी द्यायची की नाही हे सरकार ठरवत असते. त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करणार नाही पण 2023 च्या आशिया चषकासाठी ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे". तसेच भारतीय संघ सध्यातरी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही आणि पाकिस्तानी संघ देखील भारतात येऊ शकत नाही. त्यामुळे हे सर्व निर्णय सरकारवर अवलंबून आहेत. आशिया क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी हा विषय मांडू शकतो. पण बीसीसीआयच्या वतीने सध्यातरी पाकमधील स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी खेळविण्याची आमची मागणी आहे. असे जय शाह यांनी आणखी सांगितले.
2023 मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा - आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका- आयसीसी 19 वर्षांखालील मुलींची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका- आशिया चषक 2023, पाकिस्तान- आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"