कॅप्टन्सीसाठी सांगलीकर Smriti Mandhana पेक्षा मुंबईकर छोरीची निवड ठरेल चांगली; कारण...   

इथं आपण मितालीनं जे नाव घेतलंय ती मुंबईकर छोरी सांगलीकर स्मृती मानधनापेक्षा भारी पर्याय का ठरू शकते यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 05:56 PM2024-10-16T17:56:40+5:302024-10-16T18:04:21+5:30

whatsapp join usJoin us
Jemimah Rodrigues Better Than Smriti Mandhana To Be Team India New Captain After Harmanpreet Kaur Know Why | कॅप्टन्सीसाठी सांगलीकर Smriti Mandhana पेक्षा मुंबईकर छोरीची निवड ठरेल चांगली; कारण...   

कॅप्टन्सीसाठी सांगलीकर Smriti Mandhana पेक्षा मुंबईकर छोरीची निवड ठरेल चांगली; कारण...   

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय महिला संघाच्या नेतृत्व बदलाची चर्चा रंगू लागली आहे. हरमनप्रीत कौर हिच्यानंतर उप कर्णधार स्मृती मानधना हिच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडू शकते. पण भारताची माजी कर्णधार मिताली राज हिच्यामुळे कॅप्टन्सीच्या चर्चेत नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. स्मृती मानधनाऐवजी युवा जेमिमा रॉड्रिग्ज हिच्याकडे कॅप्टन्सीची जबाबादीर द्यावी, असे मत मिताली राजनं मांडलं आहे. इथं आपण मितालीनं जे नाव घेतलंय ती मुंबईकर छोरी सांगलीकर स्मृती मानधनापेक्षा भारी पर्याय का ठरू शकते यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात

स्मृती मानधनाचा अनुभव तगडा, पण...

Team India
Team India

सध्याच्या घडीला स्मृती मानधना ही भारतीय महिला संघाची कर्णधार आहे. २८ वर्षीय बॅटरनं भारतीय संघाकडून १४५ टी-२० सामने, ८५ वनडे आणि ७ कसोटी सामने खेळले आहेत. ही आकडेवारी तिचा अनुभव तगडा आहे, याचा पुरावा आहे. पण जर बीसीसीआयने महिला क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून युवा चेहऱ्याला कॅप्टन्सीची संधी देण्याचा विचार केला तर जेजेमिमा रॉड्रिग्ज  हा एक सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. कारण जेमिमानं १०४ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ३० वनडेसह ३ कसोटी सामनेही तिने खेळले आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी कॅप्टन्सीची माळ गळ्यात पडण्या इतका अनुभव तिच्याकडे नक्कीच आहे. 


संघातील अन्य खेळाडूंसोबत असणाऱ्या बॉन्डिंगची गोष्ट  

Team India
Team India

भारतीय महिला संघातील मध्यफळीतील ती आधारस्तंभ आहे. यावरून जेमिमा रॉड्रिग्जचे संघातील महत्त्व अधोरेखित होते. तिला कॅप्टन्सीच्या दावेदारीत भक्कम करणारी सर्वात मोठी गोष्ट ही की, तिचं अन्य खेळाडूंसोबत असणारे कमालीचे बॉन्डिंग. संघात खेळीमेळीचं वातावरण ठेवण्यात ती आघाडीवर असते. या गुणामुळे ती कॅप्टन्सीच्या शर्यतीत आणखी मजबूत आणि सर्वोत्तम पर्याय ठरते. भारतीय पुरुष क्रिकेट संघातील यशात ड्रेसिंग रुममधील उत्तम माहोल कारणीभूत असल्याचे दिसून येते. असा माहोल महिला क्रिकेट संघाच्या ताफ्यात निर्माण करण्यासाठी जेमिमा परफेक्ट पर्याय ठरेल.


एक पर्याय असाही 

भारतीय पुरुष संघाप्रमाणे महिला क्रिकेटमध्ये वनडे आणि कसोटीसाठी स्मृती मानधना आणि टी-२०I क्रिकेटसाठी जेमिमा हा प्रयोग आजमावण्याचा एक पर्याय देखील उत्तम आहे. महिला क्रिकेट वेळापत्रक फार व्यग्र नसले तरी पुढच्या काळासाठी मजबूत नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टिने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरू शकते.  शेवटी बीसीसीआय निर्णय घेईल तेच होणार. पण 

Web Title: Jemimah Rodrigues Better Than Smriti Mandhana To Be Team India New Captain After Harmanpreet Kaur Know Why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.