महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय महिला संघाच्या नेतृत्व बदलाची चर्चा रंगू लागली आहे. हरमनप्रीत कौर हिच्यानंतर उप कर्णधार स्मृती मानधना हिच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडू शकते. पण भारताची माजी कर्णधार मिताली राज हिच्यामुळे कॅप्टन्सीच्या चर्चेत नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. स्मृती मानधनाऐवजी युवा जेमिमा रॉड्रिग्ज हिच्याकडे कॅप्टन्सीची जबाबादीर द्यावी, असे मत मिताली राजनं मांडलं आहे. इथं आपण मितालीनं जे नाव घेतलंय ती मुंबईकर छोरी सांगलीकर स्मृती मानधनापेक्षा भारी पर्याय का ठरू शकते यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात
स्मृती मानधनाचा अनुभव तगडा, पण...
सध्याच्या घडीला स्मृती मानधना ही भारतीय महिला संघाची कर्णधार आहे. २८ वर्षीय बॅटरनं भारतीय संघाकडून १४५ टी-२० सामने, ८५ वनडे आणि ७ कसोटी सामने खेळले आहेत. ही आकडेवारी तिचा अनुभव तगडा आहे, याचा पुरावा आहे. पण जर बीसीसीआयने महिला क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून युवा चेहऱ्याला कॅप्टन्सीची संधी देण्याचा विचार केला तर जेजेमिमा रॉड्रिग्ज हा एक सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. कारण जेमिमानं १०४ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ३० वनडेसह ३ कसोटी सामनेही तिने खेळले आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी कॅप्टन्सीची माळ गळ्यात पडण्या इतका अनुभव तिच्याकडे नक्कीच आहे.
संघातील अन्य खेळाडूंसोबत असणाऱ्या बॉन्डिंगची गोष्ट
भारतीय महिला संघातील मध्यफळीतील ती आधारस्तंभ आहे. यावरून जेमिमा रॉड्रिग्जचे संघातील महत्त्व अधोरेखित होते. तिला कॅप्टन्सीच्या दावेदारीत भक्कम करणारी सर्वात मोठी गोष्ट ही की, तिचं अन्य खेळाडूंसोबत असणारे कमालीचे बॉन्डिंग. संघात खेळीमेळीचं वातावरण ठेवण्यात ती आघाडीवर असते. या गुणामुळे ती कॅप्टन्सीच्या शर्यतीत आणखी मजबूत आणि सर्वोत्तम पर्याय ठरते. भारतीय पुरुष क्रिकेट संघातील यशात ड्रेसिंग रुममधील उत्तम माहोल कारणीभूत असल्याचे दिसून येते. असा माहोल महिला क्रिकेट संघाच्या ताफ्यात निर्माण करण्यासाठी जेमिमा परफेक्ट पर्याय ठरेल.
एक पर्याय असाही
भारतीय पुरुष संघाप्रमाणे महिला क्रिकेटमध्ये वनडे आणि कसोटीसाठी स्मृती मानधना आणि टी-२०I क्रिकेटसाठी जेमिमा हा प्रयोग आजमावण्याचा एक पर्याय देखील उत्तम आहे. महिला क्रिकेट वेळापत्रक फार व्यग्र नसले तरी पुढच्या काळासाठी मजबूत नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टिने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरू शकते. शेवटी बीसीसीआय निर्णय घेईल तेच होणार. पण