Join us  

टी-२० वर्ल्ड कपआधी मुंबईकर छोरी पेटून उठली; शाहरुखच्या टीमनं फायनल गाठली!

तिच्या एकटीच्या जोरावर शाहरुखच्या  मालकीच्या संघाला फायलमध्ये नेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:51 PM

Open in App

मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जनं कॅरेबियन बेटांवरून आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये धमाका करण्यासाठी तयार असल्याचा मेसेज दिला आहे. भारतीय संघातील ही स्टार खेळाडू सध्या महिला कॅरेबियन लीगमध्ये खेळताना दिसत आहे. या लीगमध्ये तिच्या एकटीच्या जोरावर शाहरुखच्या मालकीच्या संघानं फायलमध्ये प्रवेश केला आहे. 

जेमिमानं दाखवला तोरा, शाहरुखचा संघ फायनलमध्ये पोहचला

भारताची स्टार बॅटर जेमिमान रॉड्रिग्स ही महिला कॅरेबियन लीगमधील त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. सेमी फायनलमध्ये तिने संघाकडून जबरदस्त कामगिरी केली. वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन लीगमध्ये झालेल्या बारबाडोस रॉयल्स संघाविरुद्धच्या सामन्यात जेमिमान रॉड्रिग्जचा स्फोटक अंदाज पाहायला मिळाला. तिनं केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने ४ विकेट्स राखून हा सामान जिंकला. या विजयासह त्यांनी फायलमधील आपली जागा पक्की केली असून जेतेपदापासून हा संघ आता एक पाऊल दूर आहे.

भारतीय स्टार बॅटरची नाबाद फिफ्टी

बारबाडोस संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १३० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नाइट रायडर्सच्या संघाने १९.४ षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्या टार्गेट पार केले. जेमिमा रॉड्रिग्स हिने या सामन्यात ५० चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी केली. तिच्या या कडक खेळीत ४ खणखणीत चौकारांचा समावेश होता. 

मुंबईकर छोरीनं एकहाती लढवला किल्ला

नाईट रायडर्सला फायनलमध्ये पोहचवण्यासाठी जेमिमा रॉड्रिग्स एकटी लढल्याचे दिसले. तिच्याशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला २० धावांपेक्षा अधिक धावा करता आल्या नाही. रॉड्रिग्सशिवाय संघाकडून सर्वाधिक धावांचा आकडा हा १७ धावांचा होता. ही इनिंग कायसिया नाइटनं खेळली होती. आता फायनलमध्येही संघाला तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. जेमिमा रॉड्रिग्जसाठी देखील ही कामगिरी खास आहे. कारण महिला टी-२० वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळाल्यानंतर तिच्या भात्यातून ही जबरदस्त खेळी आली आहे. आगामी वर्ल्ड कपमध्ये धमाका करण्यासाठी ती तयार आहे, याचे संकेतच तिने या इनिंगमधून दिले आहेत.  

टॅग्स :जेमिमा रॉड्रिग्जटी-20 क्रिकेटमहिला टी-२० क्रिकेटमहिला प्रीमिअर लीग