Join us  

Women's CPL 2024 : शाहरुखची स्टाईल मारली अन् 'सुंदरा मनामध्ये भरली' (VIDEO)

ऑस्ट्रेलियन छोरीचा जलवा, शाहरुखची कॉपी करत क्रिकेटच्या मैदानात केली हवा   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 2:51 PM

Open in App

क्रिकेटच्या मैदानातील खेळाडूंचे सेलिब्रेशन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. यात आता ऑस्ट्रेलियन सुंदरीचा समावेश झालाय. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरनं  क्रिकेटच्या मैदानातून शाहरुखच्या सिग्नेचर पोजसह आपल्या अदाकारीनं अनेकांना घायाळ केलं आहे. 

ऑस्ट्रेलियन छोरीचा जलवा, शाहरुखची कॉपी करत क्रिकेटच्या मैदानात केली हवा   

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर जेस जोनासे सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये आपला जलवा दाखवून देत आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये विकेट मिळाल्यावर ती  शाहरुख खानच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये आनंद व्यक्त करताना पाहायला मिळते. शाहरुखचा चाहतावर्ग अगदी जगभरात आहे. पण या छोरीचं शाहरुखशी आणखी खास कनेक्शन आहे. कारण ती कॅरेबियन महिला प्रीमिअर लीगमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व करते. हा संघ शाहरुखच्या सह मालकीचा आहे.

अन् सुंदरा मनामध्ये भरली

महिला कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 च्या यंदाच्या हंगामातील दुसरा सामना  ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि बारबाडोस रॉयल्स यांच्यात रंगला होता. या सामन्यात आलिया एलेने (११) हिला त्रिफळाचित केल्यावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरच्या अंगात शाहरुख खान संचारल्याचा सीन पाहायला मिळाला. शाहरुख खानची सिग्नेचर पोज देत तिने आपल्याला मिळालेल्या विकेटचा आनंद साजरा केला. तिचा हा अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सेलिब्रेशनचा तिचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.नेटकऱ्यांना भावलेला तिचा अंदाज 'सुंदरा मनामध्ये भरली' असा सीन क्रिएट करणारा आहे.  

जेस जोनासेनची कामगिरी  

ट्रिनबागो नाइट रायडर्स विरुद्ध बारबाडोस रॉयल्स यांच्यातील सामन्यात बॅटिंग वेळी जोनासेन शून्यावर बाद झाली. पण ही कसरत तिने आपल्या गोलंदाजीत भरून काढली. ४ षटकात  २१ धावा खर्च करत तिने २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. यात आलिया एलेनेशिवाय चमारी अट्टापट्टूच्या विकेटचा समावेश होता. तिने गोलंदाजीत कमालीची कामगिरी केली असली तरी नाइट रायडर्स संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.  बारबाडोस रॉयल्स संघाने १७ चेंडू आणि ७ विकेट राखून हा सामना खिशात घातला. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात तिने १७ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या होत्या. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटमहिला टी-२० क्रिकेटमहिला प्रीमिअर लीग