भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं नुकताच साखरपुडा केला. त्यानं सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. युजवेंद्र चहलची होणारी पत्नी डॉक्टर आणि कोरिओग्राफर व यूट्यूबर आहे. धनश्री वर्मा असे तिचे नाव आहे. साखरपुड्यानंतर युजवेंद्र आणि धनश्री सोबत विमानतळावर दिसले होते. आता धनश्रीचा विमानतळावर PPE किट घालून डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कुर्ता पजामा या पंजाबी गाण्यावर तिनं झिंगाट डान्स केला.
IPL 2020 : विश्रांतीचा कालावधी संपला; हार्दिक पांड्या कसून तयारीला लागला
युजवेंद्र अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला. शनिवारी त्यानं साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानं कुटुंबीयांच्या सहमतीनं आम्ही एकमेकांना 'हो' म्हणत आहोत, असे ट्विट केले. त्याच्या या फोटोवर नेटिझन्स आता त्याची फिरकी घेत आहेत. युजवेंद्रच्या होणाऱ्या पत्नीचं नाव धनश्री वर्मा असून ती डॉक्टर, कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर धनश्रीचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तिनं युजवेंद्रलाही डान्स शिकवतानाचे व्हिडीओ आहेत.
युजवेंद्रनं 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे. त्यानं आतापर्यंत 52 वन डे आणि 42 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 91 व 55 विकेट्स घेतल्या आहेत. धनश्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. धनश्री स्वतःच्या नावानं यू ट्यूब चॅनल चालवते आणि तिच्या प्रत्येक व्हिडीओला लाखाहून अधिक View मिळतात. ती मुळची मुंबईची आहे आणि तिची उंची 5.3 फुट आहे. यूट्यूबवर तिचे 850 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत,
पाहा व्हिडीओ..
अन्य महत्त्वाचे बातम्या
अरे देवा... IPL 2020 सुरू होण्यापूर्वीच माजी विजेत्या संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह!
खतरनाक लँडींग! Video पाहिल्यावर नुसता घामच नाही तर धडकी भरेल
मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल
IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल
बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR
अनुष्काने केली प्रश्नांची सरबत्ती; रागीट विराट पत्नीसमोर हरला; Video Viral
Web Title: 'jhingat' dance with PPE kit of Yuzvendra Chahal Wife to be Dhanshree Verma; Video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.