किंबर्ले - भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिने महिला क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झुलन गोस्वामीने एक बळी टिपत महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा ओलांडला. त्याबरोबरच महिला क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा ओलांडणारी झुलन गोस्वामी ही पहिली गोलंदाज ठरली आहे.
आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये झालेल्या दुसऱ्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 178 धावांनी धुव्वा उडवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आज झालेल्या लढतीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या जोरावर 302 धावा फटकावल्या होत्या.
त्यानंतर झुलन गोस्वामी हिने दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लॉरा व्होल्वार्टला बाद करत एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या 200 बळींचा टप्पा पूर्ण केला. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम झुलनच्याच नावे आहे. तिच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाची कॅथरिन फिट्झपॅट्रिक दुसऱ्या तर लिसा स्थळेकर तिसऱ्या स्थानी आहे.
Web Title: Jhulan Goswami 200 wickets in ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.