भारतात सर्वाधिक कमी वेळात सर्वाधिक ग्राहक मिळविलेल्या रिलायन्स जिओने वर्ल्डकपच्या धामधुमीत षटकारच खेचला आहे. हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन न घेताच वर्ल्डकपचे सामने पाहता येणार आहेत. जिओने क्रिकेट सेशन डाटा पॅक असे नाव दिले आहे.
या डेटा पॅकची किंमत 251 रुपये आहे. याचा फायदा असा की तुमचे आधीचे पॅक 1 किंवा 1.5 जीबी डाटा दिवसाचे असेल तर डाटा लवकर संपण्याची शक्यता आहे. यामुळे मॅच पाहताना खंड पडू शकतो. जर 251 रुपयांचे जादा पॅक घेतल्यास जादाचा 2 जीबीचा डेटा मिळणार आहे. याद्वारे विनाखंड क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना 14 जुलैला होणार आहे. यामुळे 51 दिवसांची व्हॅलिडीटी या दिवसापर्यंत पुरणार आहे.
रिचार्ज कसे कराल251 रुपयाचे पॅक आधीचेच आहे. दिवसाचा डेटा लिमिट संपल्यास त्यावर टॉपअप डेटा मिळविण्यासाठी हे पॅक उपलब्ध आहे. यासाठी जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवर जावे लागणार आहे. या पॅकचे पैसे ऑनलाईन भरता येणार आहेत.
जिओ टीव्ही आणि हॉट स्टारवर दिसणार मॅचरिलायन्स जिओने हॉटस्टारसोबत करार केला आहे. यामुळे जिओचे ग्राहक JioTV च्या मदतीने स्टार स्पोर्टस् चॅनलवर जावे लागणार आहे. तेथे गेल्यानंतर हॉटस्टारवर रिडायरेक्ट होणार आहे. यासाठी हॉटस्टार आधी मोबाईलमध्ये असावे लागणार आहे. या हॉटस्टारवर जिओचा नंबर रजिस्टर करावा लागणार आहे. अशा प्रकारे केवळ डेटा खर्च करून वर्ल्डकपच्या मॅच पाहता येणार आहे.