Join us

भावा स्वतःच्या जीवावरच मी इतकी वर्ष खेळलो; रोहित शर्माच्या ट्विटला Yuvraj Singhचं उत्तर

आणखी काही वर्ष खेळला असता तर... रोहितच्या ट्विटला युवीचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 10:47 IST

Open in App

बुधवारी सोशल मीडियावर अचानक #MissYouYuvi हे ट्रेंड झाले होते. 10 जून 2019 मध्ये युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि काल त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे चाहत्यांना युवीची आठवण सतावत होती. चाहत्यांचं प्रेम पाहून युवीही भारावला आणि त्यानं त्यांच्यासाठी खास ट्विट केलं. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा यानंही ट्विट करताना, तू आणखी काही वर्ष खेळला असता तर, अशी आशा व्यक्त केली. त्यावर युवीनंही मजेशीर उत्तर दिलं.

IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने टीम इंडियाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले. 2007 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयात युवीचा सिंहाचा वाटा होता. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध केलेली फटकेबाजी आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यामुळे युवीच्या निवृत्तीच्या वर्षपूर्तीनिमित्त चाहत्यांनी #MissyouYuvi हा ट्रेंड सुरू केला. त्यांचं प्रेम पाहून युवीनं लिहिलं की,''आज तुमच्याकडून मिळालेलं प्रेम पाहून मी भारावलो. आजचा दिवस खास आणि अविस्मरणीय केल्याबद्दल सर्वांचे आभार.  तुम्ही मला नेहमीच पाठींबा दिला आहात, विशेषतः माझ्या कठीण काळात...''   युवीच्या या ट्विटवर रोहित शर्मानं लिहिलं की,''आपण दोघांनी अनेक अविस्मरणीय क्षण एकत्र घालवले आहेत. कदाचित तू आणखी काही वर्ष खेळला असता तर...'' त्यावर युवीनं मजेशीर उत्तर दिलं. त्यानं लिहिलं,''भावा जेवढी वर्ष खेळलो, ती स्वतःच्या जीवावर. तुझ्यातही तिच आग मी पाहतो. पण, एक काळ असा येईल की लोकांचा तुझ्यावरील विश्वास उडेल, परंतु तू स्वतःवरील विश्वास खचू देऊ नकोस. हार मानू नकोस आणि किती दूरचा पल्ला गाठलास, याचा विचार कर. प्रयत्न करत राहा.'' 

2017मध्ये त्यानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 सामना खेळला. त्यानं 40 कसोटी सामन्यांत 1900 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 304 वन डे व 58 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 8701 व 1177 धावांसह 111 व 28 विकेट्स घेतल्या आहेत. युवीनं गतवर्षी बरोबर आजच्याच दिवशी निवृत्ती जाहीर केली होती.

 

टॅग्स :युवराज सिंगरोहित शर्मा