नवी दिल्ली : सध्या क्रिकेट विश्वात सगळीकडे टी-२० विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. मात्र भारतीय संघाचा माजी खेळाडू काही वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय बनला आहे. भारताचा आगामी टी-२० विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय संघाचे अनेक माजी खेळाडू विविध मतं व्यक्त करत आहेत. परंतु रैनाने एक रोमॅंटिक गाणं गाऊन सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अलीकडच्याच काळात रैनाने देशांतर्गत क्रिकेटमधून देखील निवृत्तीची घोषणा केली होती.
दरम्यान, सुरेश रैनाने एक अप्रतिम गाणं गाऊन आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे. त्याने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले की, "मैदानावर मोठे शॉर्ट्स मारण्याव्यतिरिक्त मी असेही काही शॉर्ट्स मारू शकतो असे तुम्हाला वाटते का? हा सुंदर ट्रॅक नुकताच ऐकला आणि तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याचा विचार केला. मला आशा आहे की तुम्हाला हे आवडेल." रैनाचे चाहते आता या गाण्यावर काही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने तर हे टॅलेंट आतापर्यंत कुठे होते अशी विचारणा केली आहे. रैनाने गायलेले हे अप्रतिम गाणं आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
टी-२० विश्वचषकात शतक ठोकणारा एकमेव भारतीय खेळाडू
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. खरं तर २२ ऑक्टोबर पासून सुपर-१२ चे सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ आठव्यांदा टी-२० विश्वचषकात सहभागी होत आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या ७ विश्वचषकात सुरेश रैना एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने शतक झळकावले आहे. रैनाने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात शतक झळकावून ही किमया साधली होती. त्याने ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६० चेंडूत १०१ धावांची खेळी केली होती. खरं तर मागील आयपीएलच्या हंगामात रैनाला कोणत्याच फ्रँचायझीने खरेदी केले नव्हते त्यामुळे तो अनसोल्ड राहिला होता. मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग असताना रैनाने शानदार खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली होती.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
२७ ऑक्टोबर - भारत वि. नेदरलॅंड, १२.३० वाजल्यापासून, सिडनी
३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, ४.३० वाजल्यापासून, पर्थ
२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, १.३० वाजल्यापासून, ॲडलेड
६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: jo tainu dhoop lagya ve This amazing song sung by Suresh Raina is going viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.