न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली असली तरी दुसरीकडे इंग्लंडच्याच फलंदाजानं खतरनाक फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघांची केविलवाणी अवस्था केली. इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-20 ब्लास्ट स्पर्धेत युवा फलंदाजानं षटकरांची आतषबाजी केली. जो क्लार्क ( Joe Clarke) असे या खेळाडूचे नाव असून त्यानं नॉटिंघमशर ( Nottinghamshire) संघाचे प्रतिनिधित्व करताना नॉर्थैंप्टनशर संघाच्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली. त्यानं 65 चेंडूंत 136 धावांची वादळी खेळी केली.
प्रथम फलंदाजी करताना नॉटिंघमशर संघानं 20 षटकांत 7 बाद 217 धावांचा डोंगर उभा केल्या. यातील निम्म्या धावा या क्लार्कने केल्या. सलामीला आलेल्या क्लार्कनं 49 चेंडूंत शतक पूर्ण केलं. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याचे हे तिसरे शतक ठरले.
India Playing XI for ICC WTC Final: टीम इंडियाची रणनीती ठरली, 3 जलदगती व 2 फिरकीपटूंसह उतरणार मैदानावर!
क्लार्कनं या खेळीत 11 चौकार व 6 षटकार खेचले, म्हणजे त्यानं 17 चेंडूंत 90 धावा कुटल्या. 20 व्या षटकात तो बाद झाला.
क्लार्कनं यापूर्वी ट्वेंटी-20 ब्लास्टमधील पहिल्या सामन्यातही दमदार खेळी केली होती. त्यानं वॉस्टरशर संघाविरुद्ध 21 चेंडूंत 45 धावा चोपल्या होत्या आणि त्यात 4 षटकार व 2 चौकारांचा समावेश होता. क्लार्कनं 76 ट्वेंटी-20 सामन्यांत 3 शतकं व 10 अर्धशतकासह 2007 धावा केल्या आहेत.
Web Title: Joe Clarke smashed 136 off 65 balls to power Nottinghamshire to the first win of their Vitality Blast title defence against Northamptonshire
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.