न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली असली तरी दुसरीकडे इंग्लंडच्याच फलंदाजानं खतरनाक फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघांची केविलवाणी अवस्था केली. इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-20 ब्लास्ट स्पर्धेत युवा फलंदाजानं षटकरांची आतषबाजी केली. जो क्लार्क ( Joe Clarke) असे या खेळाडूचे नाव असून त्यानं नॉटिंघमशर ( Nottinghamshire) संघाचे प्रतिनिधित्व करताना नॉर्थैंप्टनशर संघाच्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली. त्यानं 65 चेंडूंत 136 धावांची वादळी खेळी केली.
प्रथम फलंदाजी करताना नॉटिंघमशर संघानं 20 षटकांत 7 बाद 217 धावांचा डोंगर उभा केल्या. यातील निम्म्या धावा या क्लार्कने केल्या. सलामीला आलेल्या क्लार्कनं 49 चेंडूंत शतक पूर्ण केलं. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याचे हे तिसरे शतक ठरले.
India Playing XI for ICC WTC Final: टीम इंडियाची रणनीती ठरली, 3 जलदगती व 2 फिरकीपटूंसह उतरणार मैदानावर!