IPL 2024 Joe Root Ben Stokes : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि माजी कर्णधार जो रूट दोघेही IPL 2024 मध्ये खेळणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. IPL 2024 च्या रिटेन्शन लिस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी जो रूटने निर्णय घेतला आहे. जो रूट राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असून त्याने गेल्या हंगामातच IPL पदार्पण केले होते. IPL 2023 साठी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने जो रूटला १ कोटी रुपयांना आपल्या संघाचा भाग बनवले. मात्र, गेल्या हंगामात त्याला केवळ तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. या तीन सामन्यांमध्ये त्याने १५ चेंडूंचा सामना केला आणि एकूण १० धावा केल्या.
त्याच्या या निर्णयानंतर राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकाराने एक निवेदन जारी करून जो रूटच्या निर्णयाची माहिती दिली. "खेळाडूंना कायम ठेवण्याबाबतच्या चर्चेदरम्यान, जो रूटने आम्हाला सांगितले की तो पुढील आयपीएल हंगामात भाग घेणार नाही. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तो फार कमी काळ आमच्यासोबत राहिला. मात्र यावेळी त्याने फ्रँचायझी आणि खेळाडूंमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले. आम्ही त्याला या हंगामात मिस करू," असे संगाकाराने सांगितले.
बेन स्टोक्सचीही स्पर्धेतून माघार
आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला IPL 2024 च्या आधी मोठा झटका बसला. त्याचा संघातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक बेन स्टोक्सने IPL न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2024 पूर्वीच त्याला CSK संघाने रिलीज केले. बेन स्टोक्सने आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीच आपले नाव मागे घेतले. आगामी IPL हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाकडून आलेल्या माहितीनुसार, स्टोक्सच्या माघारीमागचे कारण त्याच्यावर कामाचा वाढता ताण आणि त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले जात आहे.
Web Title: Joe Root Ben Stokes pulls out of IPL 2024 before Auction CSK MS Dhoni Rajasthan Royals faces setback
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.