रुटच्या खेळीने इंग्लंडकडे 220 धावांची मोठी आघाडी

रुट, हसीब, मालन, रोरी यांची अर्धशतके, सामन्यावर यजमानांचे वर्चस्व; रुट आणि मालन यांनी १३९ धावांची भागीदारी केली. तर सिराजने चहापानाच्या आधी मालनला बाद केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 09:54 AM2021-08-27T09:54:44+5:302021-08-27T09:55:52+5:30

whatsapp join usJoin us
joe Root's game gave England a big lead of 220 runs against india pdc | रुटच्या खेळीने इंग्लंडकडे 220 धावांची मोठी आघाडी

रुटच्या खेळीने इंग्लंडकडे 220 धावांची मोठी आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लीड्स : इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने तिसऱ्या कसोटीतदेखील शानदार फॉर्म दाखवला आहे. त्यासोबत त्याने डेव्हिड मालनसोबत मिळून इंग्लंडला गुरूवारी दुसऱ्या दिवशी चहापानाच्या आधी २२० धावांची आघाडी मिळवून दिली. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा रुट ८० धावांवर खेळत होता. तर पुनरागमन करणारा डेव्हिड मालन हा ७० धावांवर बाद झाला. रुट मालिकेतील तिसरे शतक झळकावण्याच्या जवळ आहे. 

रुट आणि मालन यांनी १३९ धावांची भागीदारी केली. तर सिराजने चहापानाच्या आधी मालनला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी लॉर्ड्सवर इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. मात्र या सामन्यात चित्र उलट बघायला मिळाले.  इंग्लिश फलंदाजांनी चौकारांची बरसात करत भारतीय गोलंदाजीची परीक्षा घेतली. भारताचा डाव संपल्यावर जणुकाही खेळपट्टी ही फलंदाजीसाठीच योग्य वाटत होती. 

रुट याने पुन्हा एकदा संपूर्ण संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली यावेळी त्याला मालनने पुरेपूर साथ दिली. मालन हा तीन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन केले आहे. भारताचा एकही गोलंदाज गुरुवारी रुटला अडचणीत आणू शकला नाही. त्याने त्याचे ५१ वे अर्धशतक फक्त ५७ चेंडूतच पुर्ण केले.  मालन याने देखील ऑफसाईडला काही अप्रतीम फटके लगावले.  इंग्लंडने शानदार फलंदाजी केली. त्यासोबतच भारतीय संघ या सामन्यातून बाहेर जात आहे.  सकाळच्या सत्रात  इंग्लंडचे फलंदाज त्यामुळे दबावात येऊ शकले नाही. इंग्लंडने पहिल्या सत्रात ६२ धावा केल्या.   हसीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनीही अर्धशतके केली. इंग्लंडच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी या सामन्यात अर्धशतके केली आहेत.  

मोहम्मद सिराजचा व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाचा पहिल्या डावात खुर्दा उडाल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी भारतीय संघाची हुर्रे उडवली. इंग्लिश प्रेक्षकांनी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या सिराजला डिवचले त्यावर सिराजने आम्ही मालिकेत १-० ने पुढे आहोत, अशी खुण करून त्यांची बोलतीच बंद केली. त्याचा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला आहे.
बार्मी आर्मीने कोहलीला डिवचले !
लीड्स : इंग्लंडच्या बार्मी आर्मीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची टिंगल ‌उडवली. त्याला चिरीयो म्हणून देखील चिडवले. कोहलीने या सामन्यात ७ धावा केल्या. त्याने संपूर्ण मालिकेत आतापर्यत ६९ धावा केल्या आहेत.


संक्षिप्त धावफलक
n पहिला डाव भारत  - ४०.४ षटकांत सर्वबाद ७८
n इंग्लंड - रोरी बर्न्स गो. शमी ६१, हसीब हमीद गो. जडेजा ६८, डेव्हिड मालन झे. पंत गो. मोहम्मद सिराज ७०, जो रुट खेळत आहे. ८०, अंवातर १९, एकूण ९४.२ षटकांत ३ बाद २९८ धावा. 
n गोलंदाजी : मोहम्मद शमी १/७३, मोहम्मद सिराज १/६७, रवींद्र जडेजा १/३८
 

Web Title: joe Root's game gave England a big lead of 220 runs against india pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.