India Tour to England : इंडियन प्रमिअर लीग २०२२ नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका आटोपून आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी BCCI टीम बी पाठवण्याची शक्यता आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर खेळणार आहेत. भारतीय संघ १६ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे आणि १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे इंग्लंड दौऱ्यावरील पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली होती आणि ती कसोटी यंदा होणार आहे. भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असल्याने इंग्लंडसाठी ही कसोटी निर्णयाक आहे. अशात त्यांना एक मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) याने यंदाच्या समर सीजनमधून माघार घेतली आहे. त्याच्या पाठीला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसह भारताविरुद्धच्या मालिकेतही खेळणार नाही. जोफ्रा कधी मैदानावर परतेल, याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कोणताही कालावधी सांगितलेला नाही. त्यांनी दिलेल्या माहितीत No timeframe असे म्हटले गेले आहे. त्यामुळे जोफ्रा पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळेल की नाही, अशी चिंता चाहत्यांना सतावत आहे. जोफ्राला ८ कोटींत MI ने करारबद्ध केले आहे. यंदाच्या पर्वात दुखापतीमुळे त्याला सहभाग घेता आला नाही.
इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा २०१९च्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेनंतर अॅशेस मालिकेतील दोन कसोटी खेळला, त्यानंतर तो दुखापतीमुळे बाहेरच आहे. डिसेंबर महिन्यात त्याच्या कोपऱ्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळता आले नाही. त्यानंतर पुन्हा पाठीच्या दुखापतीमुळे त्याने ऑगस्ट महिन्यात अॅसेश मालिकेतून माघार घेतली.
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन ट्वेंटी-२० मालिका
पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉलदुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टनतिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिजवन डे मालिका
पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हलदुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्सतिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड