Join us  

Jofra Archer ची वाईल्डकार्ड एन्ट्री! Mumbai Indians ने केली मोठी घोषणा, इंग्लंडच्या तीन तगड्या खेळाडूंशी करार

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. सर्व दहा फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातील रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 4:48 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. सर्व दहा फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातील रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पण, त्याआधी दक्षिण आफ्रिकेत मिनी आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेत प्रथमच होणाऱ्या SA20 लीगमध्ये आयपीएलमधील फ्रँचायझींनी गुंतवणूक केली आहे. त्यात मुंबई इंडिन्सचाही समावेश आहे आणि बुधवारी MI ने मोठी घोषणा केली. मार्च २०२१नंतर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) याची SA20 लीगमध्ये WildCard एन्ट्री झाली आहे. 

२२ वर्षीय खेळाडूसाठी Mumbai Indians अन् काव्या मारन यांच्यात टक्कर; SRHची मालकिण ठरली वरचढ, Video 

जोफ्राला दुखापतीमुळे आयपीएल २०२२ मध्ये खेळता आले नव्हते, परंतु तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडच्या सराव सामन्यात त्याने काल गोलंदाजीही केली. जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह या जोडीला आयपीएलमध्ये सोबत खेळताना पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आयपीएल लिलावात जोफ्राला ८ कोटींत मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतले होते. पण, तो पहिल्या त्या सत्रात खेळणार नाही, हे फ्रँचायझीला माहीत होते. आता आयपीएल २०२३ मधून तो पुनरागमन करणार आहे. त्याआधी तो मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या MI Cape Town संघाकडून खेळणार आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री द्वारे त्याचा या लीगमध्ये समावेश केला गेला आहे.

SA 20 लीग ही १० जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. जोफ्रा MI Cape Town संघात इंग्लंडचे सहकारी सॅम करन, लिएम लिव्हिंगस्टोन व ऑली स्टोन यांच्यासोबत दिसेल. याशिवाय कागिसो रबाडा, डेवॉल्ड ब्रेव्हिस आणि राशिद खान हेही संघात आहेत.  

मुंबई इंडियन्स केप टाऊन ( MI Cape Town Squad) - रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, डेवॉल्ड ब्रेव्हिस, रियान रिकल्टन, ग्रांट रोएलोफ्सेन, वेबली मार्शल, ओडीन स्मिथ ( वेस्ट इंडिज), जॉर्ज लिंडे, ड्युआन येनसन, डेलानो पोत्गिटर, राशिद खान ( अफगाणिस्तान), लिएम लिव्हिंगस्टोन ( इंग्लंड), सॅम कुरन ( इंग्लंड), बेयूरान हेंड्रीक्स, ओली स्टोन ( इंग्लंड), वकार सलामखेइल ( अफगाणिस्तान), जियाद अब्राहम्स, कागिसो रबाडा

दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील महागडे खेळाडू ( SA 20 League Auction: COSTLIEST BUYS) - 

  • त्रिस्तान स्टब्स ( ४.१ कोटी, सनरायझर्स इस्टर्न केप)
  • रिली रोसोवू ( २.७९ कोटी, प्रेटोरिया कॅपिटल्स)
  • मार्को येनसन ( २.७४ कोटी, सनरायझर्स इस्टर्न केप)
  • वेन पार्नेल ( २.५२ कोटी, प्रेटोरिया कॅपिटल्स)
  • डोनाव्होन फेरेरा ( २.४७ कोटी, जोहान्सबर्ग सुपर किंग्स)
  • सिसांडा मगाला ( २.४३ कोटी, सनरायझर्स इस्टर्न केप)
  • हेनरिच क्लासेन ( २.०२ कोटी, डर्बन्स सुपर जायंट्स)
  • रिझा हेंड्रीक्स ( २.०२ कोटी, जोहान्सबर्ग सुपर किंग्स)
  • तब्रेझ शम्सी ( १.९३ कोटी, पार्ल रॉयल्स)
  • ड्वेन प्रेटोरियस ( १.९० कोटी, डर्बन्स सुपर जायंट्स)   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :मुंबई इंडियन्सजोफ्रा आर्चरटी-20 क्रिकेटद. आफ्रिका
Open in App