Join us  

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाची इंग्लंडमध्ये कमाल, आंतरराष्ट्रीय पदार्पणात उडवून दिली धमाल

इंडियन प्रीमिअर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचे अशक्यप्राय आव्हान पेलावे लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 8:15 PM

Open in App

लंडन : इंडियन प्रीमिअर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचे अशक्यप्राय आव्हान पेलावे लागत आहे. त्यांचे प्रमुख परदेशी खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी मायदेशात रवाना झाले आहेत आणि अशा परिस्थिती उपलब्ध खेळाडूंमध्ये त्यांना प्ले ऑफचे लक्ष्य गाठायचे आहे. मात्र, राजस्थान रॉयल्स संघ आज वेगळ्याच कारणाने जल्लोष साजरा करत आहे. त्यांच्या संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरने आज इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले आहे आणि पदार्पणातच त्याने आपली झलक दाखवली.बार्बाडोसमध्ये जन्मलेला अष्टपैलू खेळाडू आर्चरने आयर्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण केले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या पात्रता निकषात बदल केल्यामुळे त्याचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. तीन वर्ष वास्तव्यास असलेला खेळाडू इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करू शकतो. याआधी वास्तव्याची अट सात वर्ष होती. नव्या नियमाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून झाली आणि त्याचा फायदा आर्चरला झाला.  23 वर्षीय आर्चर 2015 पासून ससेक्स क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे आणि जगातील बऱ्याच ट्वेंटी-20 लीगमध्ये त्याने आपली छाप पाडली आहे. गतवर्षी राजस्थान रॉयल्स संघाने त्याला 7.2 कोटी रुपयांत चमूत दाखल करून घेतले होते. आर्चर हा बिग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतो. त्याने ऑक्टोबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याने ब्रिटीश पासपोर्ट मिळवले आणि 2015 साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये आर्चरने 11 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत.आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात आर्चरच्या पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याने आयर्लंडच्या पी. स्टर्लिंगचा अप्रतिम झेल घेतला त्यानंतर त्याने एम अॅडेरचा त्रिफळा उडवून पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळवला. त्याने आठ षटकात 40 धावा देत एक विकेट घेतली होती.इंग्लंडने आयर्लंडचा संपूर्ण संघ 198 धावांत माघारी पाठवला. लिएम प्लंकेटने चार, तर टॉम कुरनने तीन विकेट घेतले,

 

टॅग्स :इंग्लंडआयपीएल 2019राजस्थान रॉयल्स