Join us  

विराट-अनुष्का बनणार आई-बाबा; इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचं ट्विट होतंय व्हायरल, पण का?

विरुष्का 11 डिसेंबर 2017 ला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 4:31 PM

Open in App

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले. 2017 मध्ये विराट-अनुष्कानं इटलीत मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याच्या चर्चा अनेकदा उठल्या. पण, आज दोघांनी अधिकृतपणे त्यांच्या घरी पाहूणा येणार असल्याचे जाहीर केले. 'आम्ही दोनाचे तीन झालोय,' असं दोघांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जानेवारी २०२१ मध्ये घरी पाळणा हलणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. विराटच्या या ट्विटनंतर आता इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरचं पाच वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल होत आहे. ( Virat Kohli and Anushka Sharma announce pregnancy)  

आशियात अव्वल नंबर; कॅप्टन कोहलीला मिळाली आणखी एक 'गोड' बातमी! 

विराट-अनुष्काच्या गोड बातमीवर बीसीसीआय, आयसीसीच्या हटके शुभेच्छा

विरुष्का 11 डिसेंबर 2017 ला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. अनेकांना असं वाटतंय की, विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. पण, दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे.  ( Virat Kohli and Anushka Sharma announce pregnancy) 

'विरुष्का'नं दिली गोड बातमी अन् इथे नेटिझन्सनी लगावला मीम्सचा मास्टर स्ट्रोक!  

IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!

विराटनं ट्विट करताना जानेवारी 2021मध्ये कुटूंबात तिसऱ्या सदस्याचे स्वागत होईल, असे सांगितले. त्यानंतर जोफ्रा आर्चरचे ट्विट व्हायरल होत आहे. जोफ्रा आर्चरनं केलेली अनेक ट्विट्स भविष्यात खरी ठरली आहेत. त्यामुळे त्याला ज्योतिषाचार्यही म्हटले जाते. त्यामुळे विराटचं बाळ कोणत्या तारखेला जन्माला येईल, याचा संदर्भ लावून नेटिझन्सकडून आर्चरचं पाच वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल केलं गेलं आहे. ( Virat Kohli and Anushka Sharma announce pregnancy)  ( जोफ्रा आर्चर ठरला 'ज्योतिषाचार्य'; चार वर्षांपूर्वीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं! )

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माइंग्लंड